थ्वीवर सजीव सृष्टीला जगण्यासाठी आवश्यक घटक म्हणजे पाणी. पाण्यामुळं सृष्टी जिवंत राहते. सर्व सजीवांचं जीवन पाण्यावर अवलंबून असतं.
Worlds Most Expensive Water Brands : पृथ्वीवर सजीव सृष्टीला जगण्यासाठी आवश्यक घटक म्हणजे पाणी. पाण्यामुळं सृष्टी जिवंत राहते. सर्व सजीवांचं जीवन पाण्यावर अवलंबून असतं. पाणी हे बहुमोल आहे. पाणी हे जीवन आहे, असंही म्हटलं जातं. डॉक्टरही जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. पूर्वी पाणी कोणत्याही किंमतीशिवाय सहज मिळत होतं, पण आजकाल पाणी बाटल्यांमधून विकलं जातं. अनेक देशांत पाणी वेगवेगळ्या किमतीत उपलब्ध आहे. अशा स्थितीत आम्ही तुम्हाला जगातील अशा ब्रँड्सबद्दल सांगत आहोत, ज्यांचं पाणी खूप महाग आहे.Acqua di Cristallo Tributo a Modigliani हे जगातील सर्वात महाग पाणी आहे. त्याची 750 मिली किंमत $ 6000 म्हणजेच, सुमारे 43 लाख रुपये आहे. हे पाणी फिजी आणि फ्रान्समधील नैसर्गिक झऱ्यातून येतं. ह्या पाण्याची बाटली 24 कॅरेट सोन्याची असून या बाटलीची पॅकिंग किंमत सर्वाधिक आहे.Kona Nigari Water हे हवाई (Hawai) आणि प्लास्टिकच्या बाटल्यांमधून विकलं जातं. या पाण्याचा वापर वजन कमी करण्यासाठी केला जातो. यामुळं ऊर्जा तर वाढतेच, पण त्वचा देखील उजळण्यास मदत होते. हे पाणी हवाई बेटांवरून येतं. शिवाय हे पाणी इतर पाण्याच्या तुलनेत खूप जलद हायड्रेट होतं. त्याची 750ml ची किंमत 29306 रुपये इतकी आहे.फिलिको ज्वेल वॉटर : हा एक जपानी वॉटर ब्रँड आहे, तो स्वारोवस्की क्रिस्टल्सनं सजलेला आहे. बाजारात या बाटल्या काही प्रमाणातच उपलब्ध आहेत. ही बाटली सोनेरी मुकुटानं झाकण्यात आलीय. हे पाणी ओसाकाजवळील रोक्को पर्वतावरून येतं. तसेच हे पाणी ग्रॅनाइटद्वारे फिल्टर केलं जातं. यात भरपूर ऑक्सिजन असतो. या पाण्याच्या 750ml बाटलीची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.Bling H20 पाणी अमेरिकेतून येतं. याची शुद्धीकरण प्रक्रिया 9 टप्प्यांत केली जाते. ही बाटली शॅम्पेनची बाटली असल्याप्रमाणं ब्लिंगनं सजलेलीय. याची 750ml ची किंमत सुमारे 3000 रुपये आहे.हे स्प्रिंग वॉटर आहे. जे कॅनडाहून आलंय. याची किंमत प्रति 750 मिली $14 डॉलर इतकी आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.