बॉलीवू़ड अभिनेत्री दिपिका पादुकोण कोणत्याही प्रकारच्या फॅशन स्टाईलमध्ये चांगली दिसते हे सर्वांनाच माहित आहे. दिपिका कॅज्युअल लूक पासून कान्स लूक पर्यंत कोणतेही कपडे स्टाईलिश अंदाजमध्ये दिसते. वेस्टर्नसोबत इंडियन लूकमध्ये दिपिका सुंदर दिसते. दिपिकाचा साडी लूक पाहून तिचे चाहते घायाळ होतात.
नुकतीच दिपिका कौन बनेका करोडपती 13 च्या सेटवर आली होती. तेव्हा दिपिकाने (yellow Pleated blouse) येलो प्लेटेड ब्लाऊज आणि मल्टीकलर ऑरगेंझा साडी परिधान केली होती. मल्टीकलर साडीमध्ये ब्लू, पिंक आणि येलो शेड्सचा समावेस होतो.
येलो ब्लाऊजवर या साडीमध्ये दिपिकाला अगदी शोभून दिसत होती. दिपिकाच्या या सुंदर साडीची किंमत 19 हजार 800 रूपये असून ही साडी पायल खंडावाला यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर उपलब्ध आहे. दिपिकाने या साडीवर Turquoise कलरचे स्टोन स्टडेड इयररिंग्जही वापरले होते. तसेच बन हेअरस्टाईलमूळे तिने इंडियन लूकला मोहक आणि क्लासी टच दिला होता. 20 पेक्षा कमी किंमत असलेल्या साडीमध्ये दिपिकाचा सुंदर लूक सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. KBC 13 च्या सेटवर अमिताभ बच्चन आणि फराह खानसोबत दिपिराचे फोटोज देखील पोस्ट केले आहे. सेटवरील खेळी-मेळीचे वातारणही प्रोमोमध्ये दाखवले आहे. कित्येक कार्यक्रमांमध्ये दिपिकाचे तिच्या फॅशन सेन्समुळे कौतूक झाले आहे. गेल्या वर्षी तिचा नवरा रणवीर सिंह सोबत आईच्या वाढदिवशी लाल बलून टॉप आणि लेदर जीन्समध्ये दिसली होती. तिच्या या आऊटफिटची तेव्हाही खूप चर्चा झाली होती. दिपिकाचा एअरपोर्ट लूक मुळे देखील की स्टाईल आयकॉन ठरते.दिपिका कॅज्युअल लूक पासून कान्स लूक पर्यंत कोणतेही कपडे स्टाईलिश अंदाजमध्ये दिसते. वेस्टर्नसोबत इंडियन लूकमध्ये दिपिका सुंदर दिसते. दिपिकाचा साडी लूक पाहून तिचे चाहते घायाळ होतात.दिपिका पादूकोणने नुकतेच शकून बत्रा यांच्या चित्रपटाचे शुटिंग पुर्ण केले. यामध्ये सिद्धांत चतूर्वेदी आणि अनन्या पांडे देखील आहे. या फिल्मचे टाईटल अजून प्रसिद्ध झाले नाही.
दिपिका 83, फायटर, द इंटर्न, पठाण, सर्कससोबतच साऊथ सुपरस्टार प्रभास सोबत एक फिल्ममध्ये काम करत आहे. तिच्याकडे काही हॉलीवूड प्रोजेक्ट देखील आहेत सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.