Dipti Ketkar, Anvita Phaltankar Instagram
झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या मालिकेत नलूची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीप्ती केतकर आणि ऑनस्क्रीन तिच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. दीप्तीने नुकतेच अन्वितासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. 'स्वीटू म्हणजेच अन्विता पडद्यावर माझ्या मुलीची भूमिका साकारतेय म्हणून ऑफस्क्रीन किंवा खऱ्या आयुष्यात मी तिच्यासोबत पालकांसारखी वागणार नाही असं ठरवलं होतं. पण नकळत हे नातं जोडलं गेलं आणि आता आणखी घट्ट झालं', अशा शब्दांत दीप्तीने तिच्या भावना व्यक्त केल्या. कदाचित लॉकडाउन किंवा दोघींचा स्वभाव सारखा असल्याने आमचं नातं खूप छानप्रकारे जोडलं गेलं असावं, असं तिने लिहिलं. अन्विताने 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. ती साकारत असलेली स्वीटूची भूमिका सध्या फार लोकप्रिय झाली आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.