विदेशात फिरायला जायची अनेकांची इच्छा असते, परंतु त्यासाठी खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते. हा खर्च पेलण्याची क्षमता अनेकांच्यात नसते. त्यामुळे परदेशात फिरायला जायचं अनेकांचं स्वप्न अपुरंच राहतं. परंतु आज आम्ही अशा काही देशांची नावे सांगणार आहोत, जिथं तुम्ही अगदी कमी खर्चात फिरु शकता.
इजिप्त (Egypt)- इजिप्तच्या पर्यटन स्थळांमध्ये मंदिरे, पिरॅमिड, वाळवंटातील ट्रेक, सुंदर नाईल नदी यांचा समावेश आहे. येथे दरवर्षी जगभरातून पर्यटक येतात. जर तुम्ही जूनमध्ये भेट देण्याचा विचार करत असाल, तर इजिप्त हे खूप चांगले ठिकाण आहे आणि स्वस्त देखील आहे. येथे तुम्ही डायव्हिंग, सेलिंग आणि सर्फिंग सारख्या जलक्रीडांचा आनंद घेऊ शकतायेथे चार रात्री आणि पाच दिवस राहण्यासाठी एका व्यक्तीला सुमारे 43,572 रुपये मोजावे लागतात.
कंबोडिया (Cambodia)- हा एक अतिशय सुंदर देश आहे. हा देश आपल्या सांस्कृतिक समृद्धीने पर्यटकांना आकर्षित करतो. कंबोडिया समुद्रकिनारे, जंगल टूर आणि प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. इथेही अनेक ऑफबीट डेस्टिनेशन्स आहेत. इथे चार रात्री पाच दिवसांच्या सहलीची किंमत प्रति व्यक्ती 44,900 रुपये आहे. येथे हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च 3,000 रुपये असू शकेल.
भूतान (Bhutan)- नयनरम्य परिसरात असलेली प्राचीन मंदिरे आणि किल्ले भूतानला खास बनवतात. येथील पुनाखा किल्ला, बुद्ध दोरडेमा पुतळा आणि डोचुला खिंड पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. येथे चार रात्री पाच दिवस प्रवास करण्याचा एकूण खर्च प्रति व्यक्ती २२ हजार रुपये येतो. येथील हॉटेल्समध्ये राहण्याची किंमत प्रति रात्र 2,700 रुपयांपासून सुरू होते.
मालदीव (Maldives) - मालदीव हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण भागात स्थित आहे. मालदीव हे पाम वृक्ष, शॉपिंग कॉम्प्लेक्स, वॉटर व्हिला आणि सुंदर समुद्रकिनारे यांसाठी खूप लोकप्रिय आहे. हनिमूनला गेलेल्या नवविवाहित जोडप्यांसाठी हे ठिकाण उत्कृष्ट हनिमून डेस्टिनेशन आहे. येथे चार रात्र पाच दिवसांच्या प्रवासाचा खर्च ३० हजार रुपये प्रति व्यक्ती आहे. तुम्ही हॉटेल किंवा व्हिलामध्ये राहत असल्यास येथे राहण्यासाठीचा खर्च 5,900 रुपयांपासून सुरू होतो.
श्रीलंका - (Shrilanka)- जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात एकटे फिरायला आवडत असेल किंवा समुद्राजवळ निवांत हिंडावं वाटत असेल, तर अशांसाठी श्रीलंका हे उत्तम ठिकाण आहे. श्रीलंकेला मोठा इतिहास आहे. रामायण आणि महाभारतातही याचा उल्लेख आहे. साहसी खेळांव्यतिरिक्त, श्रीलंका हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथे चार रात्री आणि पाच दिवस प्रवास करण्याचा एकूण खर्च 19,448 रुपये प्रति व्यक्ती असेल. येथील हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च 2600 रुपये प्रति रात्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.