swami vivekanand rock memorial sakal
अनन्यचित्त होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरूण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणीच भावी 'रामकृष्ण संघाची' पायाभरणी झाली
स्वामी विवेकानंद हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते.रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते.त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा (शिकवण, पद्धती) परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावलीरामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली."माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो...", या शब्दांनी सुरू झालेल्या त्यांच्या भाषणासाठी ते फार प्रसिद्ध आहेत ज्यामध्ये त्यांनी १८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला.
समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला आणि शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.