Jalgaon Crime : डेअरी मालकाने दुधाचे पेमेंट करण्यासाठी बँकेतून काढलेल्या पैशांवर एकाने शिताफीने डल्ला मारून दुचाकीला लावलेली एक लाख दहा हजार रुपये रक्कम असलेली पिशवी लंपास केली.
ही घटना कजगाव नाक्याजवळ बुधवारी (ता.४) दुपारी चारच्या सुमारास घडली. (1 lakh 10 thousand stolen from a bag jalgaon crime news)
शहरातील सेंट्रल बँकेतून दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास सुनील हिंमतराव पाटील (रा. टिटवी, ता. पारोळा) हे आपल्या गावी टिटवी येथे दुधाचा व्यवसाय करतात. ग्राहकांना दुधाचे पेमेंट करण्यासाठी त्यांनी पारोळा येथील सेंट्रल बँकेतून सुमारे एक लाख दहा हजार रुपये काढले.
ते पैसे एका पिशवीत ठेवले व दुचाकीच्या हँडलला टांगून ते कजगाव रस्त्यावर पोहोचले. तेथे आपल्या नातेवाइकाला बसमध्ये बसविण्यासाठी थांबले असता एका अज्ञात दहा ते बारा वर्षीय मुलाने दुचाकीला टांगलेली पैशांची पिशवी काढून पोबारा केला.
काही क्षणातच त्यांना पैशांची पिशवी गायब असल्याचे लक्षात आले असता लगेच आरडाओरड केली. परंतु चोरटा लगेच पसार झाला होता.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
याबाबत घटनास्थळी लगेच पोलिसांनी धाव घेतली असता सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दहा ते बारा वर्षीय अल्पवयीन चोरटा पिशवी चोरून पसार होत असल्याचे चित्रीकरण दिसत होते. येणाऱ्या काळात पोलिसांना चोर शोधण्याचे मोठे आव्हान आहे. म्हणून याबाबत पारोळा पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.