जळगाव : येथील प्रवासाला साबुदाणा वड्यासोबत शेंगदाणाच्या लाडूत गुंगीचे औषध देवून १ लाख ११ हजारांत लुबाडण्याचा प्रकार ५ जानेवारीस घडला होता. प्रवासी मुंबईला गेल्यानंतर त्याला जाग आली असता, त्याच्याकडील वरील रक्कम लंपास झाल्याचे कळले. त्यांनी ६ जानेवारीस कल्याण रेल्वे पोलिसांत तक्रार दिली. (1 lakh rupees stolen by giving gungi medicine to passenger in train jalgaon crime news)
जीआरपी पोलिसांनी तब्बल १५ दिवसांनी संशयिताला अटक केली. ४ जानेवारीस शिवदास रामचंद्र पाटील गीतांजली एक्सपेसने मुंबईलस निघाले होते. ही गाडी जळगाव रेल्वेस्थानकाच्या प्लटफार्म क्रमांक दोनवर आली असता, त्यांच्याशेजारी एक अनोळखी प्रवासी बसला. त्यांच्याशी ओळख करून मादक द्रव्यमिश्रित शेंगदाण्याचा लाडू त्यांना खाण्यास दिला.
ते बेशुद्ध होताच त्यांच्याकडील एक लाख, ११ हजार, १०० रुपयांची रोकड लांबविली. अनोळखी प्रवासी कल्याणला उतरला. त्याचवेळी श्री. पाटील यांना जाग आली. त्यांना आपली रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी तेथे जीआरपी पोलिसांत तक्रार दाखल दिली. ७ जानेवारीस ती तक्रार हस्तांतरण आयपीसींतर्गत गुन्हा दाखल झाला. नंतर या प्रकरणाचा तपास भुसावळ जीआरपी पोलिसांकडे आला. त्यांनी टीम तयार करून संशयितांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केला.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
रविवारी (ता. २२) दुपारी दीडच्या सुमारास सीपीडीएस टीम एमएमआरमध्ये तैनात निरीक्षक बायनी प्रसाद मीना, हवालदार अरुण कुमार, सागर वर्मा यांनी ०११३९ या क्रमांकाच्या ट्रेनमध्ये तपासणी करीत असताना, मनमाड ते नाशिक रोडदरम्यान एका संशयित व्यक्तीचे नाव मिळाले. मिश्रीलाल द्वारकाप्रसाद मौर्य (रा. भवैरनगर, पो. मेहनवण, जिल्हा गोंडा, उत्तर प्रदेश) याला संशयावरून पकडले.
त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता, त्याच्याजवळ २४ हजारांची रोकड, औषधांचा लाडू, टिफीन बॉक्स, मेरफॅक्स औषधी बॉक्स, आधार कार्ड व कपडे आदी मिळून आले. संशयिताकडे चौकशी केली असता, त्याने प्रवाशांशी मैत्री करून त्यांना नशामिश्रित लाडू खाऊ घालून त्यांच्या सामानाची चोरी केल्याची कबुली दिली.
४ जानेवारीस केलेल्या गुन्हाचीही कबुली दिली. संशयिताविरुद्ध यापूर्वीही अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक करून भुसावळ रेल्वे पोलिसांकडे दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.