Jalgaon News : महापालिकेतर्फे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यासाठी एमबीबीएस पदवीधारक डॉक्टर न मिळाल्यास बीएएमएस डॉक्टर भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या दवाखान्यात डॉक्टरांची भरती करून ते जनतेच्या सेवेसाठी लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे.
महापालिकेतर्फे जळगाव शहरात तीन आरोग्यवर्धिनी केंद्र व १४ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी महापालिकेने स्वत:च्या इमारतीत ११ जागा तयार केल्या आहेत. (10 Aapla Dawakhana of Municipal Corporation in city jalgaon news)
परंतु सहा जागा भाडेतत्त्वावरील जागेत सुरू करण्यात येणार आहेत. परंतु त्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने अकरा जागांवर आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापैकी एक दवाखाना सुरू करण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी एमबीबीएस पदवीधारक डॉक्टर न मिळाल्याने ते सुरू करण्यात आले नव्हते.
बीएएमएस भरण्यास मंजुरी
एमबीबीएस डॉक्टर भरतीसाठी महापालिकेने जाहिरात दिली होती. मात्र, आवश्यक असलेले त्या पदवीचे डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे महापालिकेतर्फे शासनाला पत्र देण्यात आले होते. एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यामुळे दवाखाने सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहे. तरी आपण पर्याय सुचवावा, असे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने महापालिकेच्या वैद्यकीय विभागास पत्र पाठविले असून, एमबीबीएस पदवीचे डॉक्टर न मिळाल्यास बीएएमएस डॉक्टर भरण्यात यावेत, असे कळविण्यात आले आहे.
दवाखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा
शासनाने बीएएमएस डॉक्टर भरण्यास परवानगी दिलेली असल्याने आता महापालिकेचे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जळगाव शहरात आता पूर्ण १७ दवाखाने विविध भागात सुरू होणार आहेत.
केवळ होती डॉक्टरांची प्रतीक्षा
शहरातील दहा दवाखाने सुरू करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. महापालिकेच्या जागेवर दुरुस्ती करण्यात येऊन दवाखान्यासाठी लागणारे साहित्य, तसेच कर्मचारी भरती करण्यात आली आहे. केवळ एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याने, तसेच शासनाची तशी अटच असल्याने हे दवाखाने सुरू करण्यास अडचण निर्माण होत होती. शासनाच्या नवीन आदेशामुळे आता डॉक्टर भरती होणार आहे.
भरती जिल्हा शल्यचिकित्सक करणार?
महापालिकेच्या आपला दवाखानासाठी आवश्यक असलेली बीएएमएस डॉक्टरांची भरती जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत करण्याबाबत महापालिकेने प्रस्ताव दिला होता. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने ती भरती जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत भरण्यात यावी, असे कळविण्यात आले होते. मात्र आता महापालिकेत नवीन अधिकारी रुजू झाले आहेत. त्याचे पदभारही बदलले आहेत. त्यामुळे नवीन अधिकारी काय निर्णय घेतात, यावरच आता भरतीप्रक्रिया अवलंबून आहे.
शहरातील ‘आपला दवाखाना’ केंद्रे असे
ऑक्सिजन पार्क (मुक्ताईनगर), बालवाडी, विजय कॉलनी, गणेश कॉलनी
मनपा शाळा क्रमांक १५, गेंदालाल मिल,
बालवाडी कांचननगर शनिपेठ, चौघुले प्लाट
मनपा शाळा क्रमांक २२ जोशी पेठ, जुने जळगाव
मनपा शाळा क्रमांक २४ खेडी शिवार
मनपा शाळा क्रमांक ५० रामेश्वर कॉलनी
मनपा शाळा क्रमाकं ४८ सोमाणी मार्केट, पिंप्राळा
मनपा बालवाडी क्रमांक ५ शिवकॉलनी,
मनपा हॉल पोलिस कॉलनी, सुप्रीम कॉलनी,
मनपा हॉल राधाकृष्णनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.