District Milk Union Election esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्हा दूध संघासाठी 100 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : माजी मंत्री, आमदार एकनाथ खडसे, मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक सघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत शनिवारी (ता. १०) शंभर टक्के मतदान झाले. दरम्यान, रविवारी (ता.११) सकाळी आठपासून मतमोजणी होणार असून, दुपारी एकपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदासाठी शनिवारी मतदान झाले. जिल्ह्यात ४४१ मतदारांना मतदान करण्यासाठी सात मतदान केंद्र होते. सकाळी आठपासून मतदानास प्रारंभ झाला. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानासाठी दोन बूथ ठेवण्यात आले होते. जळगाव येथील मतदान केंद्र रिंगरोडवरील सत्यवल्लभ हॉल येथे ठेवण्यात आले होते. (100 percent Voting for District Milk Union Jalgaon News)

जळगावात दोन्ही मंत्र्यांचे मतदान

जळगाव येथील सत्यवल्लभ हॉल येथील मतदान केंद्रावर जामनेर व जळगाव तालुक्यातील मतदान होते. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी या केंद्रावर मतदान केले. तर महापौर जयश्री महाजन यांनी देखील याच केंद्रावर मतदान केले.

शंभर टक्के मतदान

जिल्ह्यात एकूण सात मतदान केंद्र होते. या मतदान केंद्रावर सकाळी आठपासून मतदानास प्रारंभ सकाळी दहापर्यंत अठरा टक्के तर दुपारी बारापर्यंत ६० टक्के मतदान झाले. दुपारी चारपर्यंत संपूर्ण शंभर टक्के मतदान झाले. सर्व ४४१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

केंद्रनिहाय मतदान असे : अमळनेर-७८, भुसावळ-४४, चाळीसगाव-५८, एरंडोल- ६७, फैजपूर- ६१, जळगाव- ५७, पाचोरा- ७६.

हेही वाचा : असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

आज निकाल

मतदानाची रविवारी (ता. ११) मतमोजणी होणार आहे. याबाबत माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी सांगितले, की रिंगरोडवरील सत्यवल्लभ हॉल येथेच सकाळी आठला मतमोजणीस प्रारंभ होईल. त्यासाठी सात टेबल तयार ठेवण्यात आले आहेत. २१ कर्मचारी मतमोजणीसाठी असतील. दुपारी एकपर्यंत निकाल जाहीर होईल.

दोन्ही गटाचा विजयाचा दावा

निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे ‘सहकार’ तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘शेतकरी’ पॅनल असून, दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT