Jalgaon Crime : अमली पदार्थाची बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तरुणाला येथील पोलिसांनी अटक करून त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे पारदर्शक झिप पाऊचमध्ये क्रिस्टल एम. डी. ड्रग्ज हा अमली पदार्थ मिळून आला.
पोलिसांनी त्याचे वजन केले असता, दहा किलो १७० ग्रॅम भरले. संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, तो या ड्रगची शहरात कोणाला विक्री करणार होता, याचा पोलिस शोध घेत आहेत. (11 kg of drugs seized in Chalisgaon jalgaon crime news)
हवालदार आशुतोष सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील मालेगाव रस्त्यावरील नवीन पुलाच्या खाली आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास बजाज कंपनीच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून (एमएच ४१, एएच ७१७५) संशयित आरोपी शेख मोहम्मद आरिफ उर्फ शादाब मोहम्मद जमील (वय २३, रा. चौथा माळा, समरुरू बाग, तेली चाळ, हसनसेठ बिल्डिंग, भिवंडी, ता. ठाणे, ह. मु. साठफुटी रोड, पॉवर हाउस, जिरेबाबा दर्ग्याजवळ, मालेगाव) हा संशयास्पदरीत्या फिरताना मिळून आला.
त्याची पोलिसांनी चौकशी करून त्याच्याजवळची बॅग तपासली असता, त्यात सुमारे २० हजार ३४० रुपये किमतीचे पारदर्शक झिप पाऊच फिक्कट पिवळसर रंगाचे क्रिस्टल एमडी हा अमली पदार्थ मिळून आला. त्याला पोलिसांनी दुचाकी व मुद्देमाल अशा एकूण ८० हजार ३४० रुपयांच्या ऐवजासह पकडून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
ही कारवाई करणाऱ्या पथकात पोलिस निरीक्षक संदीप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार संदेश निकुंभ, पोलिस कर्मचारी विनोद भोई, पंढरीनाथ पवार, राहुल सोनवणे, संदीप रमेश पाटील, नितीन वाल्हे, मुकेश पाटील, महेंद्र पाटील, भूषण पाटील, रवींद्र बच्छे, ज्ञानेश्वर पाटोळे, महेश बागूल, संदीप बाळासाहेब पाटील, आशुतोष सोनवणे, वजन मापाडी हितेश जैन, छायाचित्रकार अनिकेत जाधव यांचा सहभाग होता.
उपनिरीक्षक योगेश माळी व हवालदार विनोद भोई हे तपास करीत आहेत. दरम्यान, हे ड्रग्ज चाळीसगावात विकण्यासाठी आणले जात होते की अजून कुठे नेले जात होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.
ललित पाटीलचा चाळीसगावशी संबंध?
नाशिक येथील ललित पाटीलच्या ड्रग्ज प्रकरणानंतर राज्यभरात एमडी ड्रग्जचे रॅकेट किती खोलवर रुजले आहे, हे यापूर्वीच दिसून आले आहे. दरम्यानच्या काळात ललित पाटील चाळीसगावला येऊन गेल्याची जोरदार चर्चा होती. काही दिवसांपूर्वी अंधारी (ता. चाळीसगाव) गावातही नाशिकचे पोलिस चौकशीसाठी येऊन गेले होते. अशातच चाळीसगाव पोलिसांनी एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्याला पकडल्याने ललित पाटीलचा चाळीसगावशी संबंध असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.