Central Railway esakal
जळगाव

Central Railway: मध्य रेल्वेला 12 हजार कोटींचा महसूल; 8 महिन्यातील कामगिरी

मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या आठ महिन्यांत बारा हजार ४९७ कोटी ४१ लाखांचा महसूल प्राप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Central Railway : मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या आठ महिन्यांत बारा हजार ४९७ कोटी ४१ लाखांचा महसूल प्राप्त केला. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ ला एकूण दहा हजार ८४८ कोटी ८९ लाखांचा महसूल मिळाला होता. त्यातुलनेत यंदाचा आठमाही महसूल १५.२१ टक्क्यांनी अधिक आहे. मध्य रेल्वेने वाणिज्यक महसुलात सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी करण्याची गती कायम ठेवली आहे.

प्रवाशांच्या वाहतुकीमध्ये १०.४६ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेने एकशे तीन कोटी ९२ लाख प्रवाशांची वाहतूक केली. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ९४ कोटी सात लाख ८० हजार प्रवाशांची वाहतूक केली होती. (12 thousand crore revenue to Central Railway jalgaon news)

तसेच एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रवासी महसूल चार हजार ६९९ कोटी १० लाख प्राप्त केला. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ मध्ये चार हजार ७७ कोटी ६२ लाख महसूल मिळविला होता. त्यातुलनेत यंदाच्या महसुलात १५.२४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

साहित्य वाहतुकीत १४ टक्क्यांची वाढ

वस्तू व साहित्याच्या वाहतुकीचा एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ मध्ये महसूल सहा हजार १४६ कोटी ८३ लाख इतका होता. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ मध्ये हा महसूल पाच हजार ३८० कोटी १५ लाख होता. त्यातुलनेने महसुलात १४.२५ टक्क्यांची वाढ झाली.

यंदा इतर कोचिंग, सामान, नॉन-फेअर महसूल आणि विविध माध्यमांतून प्राप्त झालेला महसूल (विविध, पार्किंग, केटरिंग, विश्रामगृह, शौचालय वापर आदींसह) एक हजार ६५१ कोटी ४८ लाख इतका आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत एक हजार ३९१ कोटी १२ लाख महसूल मिळविला होता. त्यातुलनेत यंदा १८.७१ टक्क्यांची वृद्धी राहिली.

आकडे बोलतात (महसूल आकडे रुपयांमध्ये दर्शवितात)

वाहतूक = नोव्हेंबर २०२२ मध्ये नोव्हेंबर २०२३
प्रवासी =तेरा कोटी सात लाख ६० हजार तेरा कोटी पंधरा लाख ६० हजार
प्रवासी महसूल = ५७० कोटी ८६ लाख ५९५ कोटी ५६ लाख
वस्तू आणि साहित्य = ७८५  कोटी ५१ लाख ७८१ कोटी ८३ लाख
इतर = २०३ कोटी ८२ लाख १९१ कोटी ८५ लाख

"मध्य रेल्वेने उत्पन्नाला चालना देण्यासाठी राबविलेले विविध उपक्रम, जसे विभागांवर व्यवसाय विकास केंद्र (बीडीयू) स्थापन करणे आणि इतर भाडे-व्यतिरिक्त महसूल उपक्रम व मुख्यालय कार्यालयातील विपणनसह इतर तत्सम नावीन्यपूर्ण कल्पनांमुळे महसुलात वाढ झाली आहे." - जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी (रेल्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT