Child death esakal
जळगाव

Jalgaon News : मामासोबत दर्शनाला गेला अन्....कुटुंबीयांचा आक्रोश!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गुरुवारी (ता. ६) हनुमान जयंती असल्याने आदित्य हा त्याचा मामा जितू गारूंगे आणि मामी आरती गारूंगे याच्यासोबत दुचाकीवरून रिधूर येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेला होता. (12 year old boy died of poisoning jalgaon news)

हनुमान जयंतीला मामासोबत दर्शनाला गेलेल्या शहरातील कंजरवाड्यातील १२ वर्षीय मुलाचा विषबाधेने मृत्यू झाला.

विषबाधा झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आदित्य योगेश माचरे, असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

आदित्य माचरे आई व दोन बहिणींसोबत वास्तव्याला होता. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर आई रिना माचरे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. दर्शन घेतल्यानंतर परत येत असताना, कोळन्हावी येथील सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी चढत असताना, आदित्यला अचानक उलट्या झाल्या.

आदित्याला मामाने तातडीने खासगी वाहनाद्वारे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन आले. जेवणानंतर उन्हात फिरत असताना, त्याला विषबाधा झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कुटुंबीयांचा आक्रोश

आदित्य हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच आई व दोघा बहिणींनी प्रचंड आक्रोश केला. नातलगांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT