जळगाव : दोन वर्षात तेरा पेटंट नोंदविण्याचा इंडिया बुक ऑफचा विक्रम शहरातील जी. एच. रायसोनी बिझनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख व संशोधक प्रा. डॉ. दीपेन कुमार रजक यांनी नोंदविला आहे.
सामान्यांपासून उद्योगांपर्यंत कमीत कमी वेळ व खर्चात बहुउपयोगी संशोधन उपलब्ध करून देणे, हा संशोधनाचा मुख्य गाभा आहे. डॉ. दीपेन कुमार यांनी आयआयटी येथे मटेरिअल अॅन्ड डिझाईन या विषयात पीएचडी केली असून भारतातील विविध नामवंत संस्थांमध्ये प्राध्यापक व संशोधक म्हणून सेवा बजावली आहे.
अमेरिका, सौदी अरेबिया, इराण, दुबई आदी देशांच्या विविध संस्थांसोबत एकत्रित काम करीत आहेत. या यशाबद्दल संचालक प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या पेटंटचा समावोश
पॉवर स्टोरेज सिस्टमसह थर्मास बाटलीमध्ये पाणी गरम करण्यासाठी बहु-ऊर्जा स्रोतांचा वापर करणे, झटपट इलेक्ट्रिक हीटिंग वॉटर नळ प्रणाली आणि संरचना, सामग्रीची पद्धत आणि वितळण्यासाठी मल्टी-फंक्शनल इंडक्शन, स्मार्ट तंत्रासह आधुनिक हंडी, चाचणी नमुने तयार करण्याची पद्धत आणि त्याकरिता मोल्डिंग डाय, ऊर्जा कार्यक्षम स्मार्ट प्रेशर (EESP) वेसल सिस्टम, स्मार्ट कंट्रोल प्रेशर वेसल, स्मार्ट कमोड, हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग आणि मेटल फोमसह मॉड्यूलर हायब्रिड क्रॅश बॉक्स, इंडो-वेस्टर्न अॅडजस्टेबल स्मार्ट कमोड सिस्टीम आणि त्याच्या पद्धती, नल टॅप डिझाइन (एफटीडी) आणि द्रव आणि वायूंसाठी फॅब्रिकेशन पद्धत, फायबर-रिइन्फोर्स्ड पॉलिमर (FRP) संमिश्र साहित्य आणि त्याच्या पद्धती, प्रथमोपचार किट वेंडिंग मशीन (FKVM) प्रणाली आणि त्याच्या पद्धती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.