the child died when the same wall of the village school fell down. esakal
जळगाव

Jalgaon News : शाळेची संरक्षक भिंत पडून बालकाचा मृत्यू; नशिराबादची घटना

सकाळ वृत्तसेवा

नशिराबाद (जि. जळगाव) : नशिराबाद गावात शाळेची निर्माणाधीन संरक्षण भिंत पडून १३ वर्षीय बालकाचा दबून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ३१) सकाळी घडली.

याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, घटनेनंतर बालकाच्या नातलगांनी शाळा व्यवस्थापन सदस्य, बांधकाम ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी केली. (13 year old boy was crushed to death by school protective wall fall jalgaon news)

अशी घडली घटना

नशिराबादमधील मोहित योगेश नारखेडे (वय १३ रा. वरची अळी) सातवीच्या वर्गात शिकत होता. शाळेला सुट्ट्या असल्याने शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मित्रांसोबत सनसवाडी रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर तो खेळायला गेला. खेळता खेळता अचानक शाळेची संरक्षण भिंत त्याच्या अंगावर पडली.

त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुपारी बारच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपास हवालदार प्रकाश पाटील आणि योगेश माळी करीत आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आईवडिलांचा आक्रोश

मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आईवडिलांचा आक्रोश मन हेलावणारा होता. मृताच्या पश्चात मोठा भाऊ केतन, आई निर्मलाबाई आहे, तर वडील नशिराबाद येथील ओरिएंट कंपनीच्या सिमेंट फॅक्टरीत ट्रॅक्टरचालक म्हणून नोकरीला आहेत.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित शाळा प्रशासन आणि ठेकेदारावर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेडे व नालतगांनी घेतला.

पोलिस व प्रशासनाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे नशिराबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT