KBCNMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील १४ महाविद्यालयांमध्ये बहिणाबाई अभ्यासिकांना प्रारंभ होत असून, पैकी चार अभ्यासिका सुरू झाल्या आहेत. येत्या आठवडाभरात उर्वरित सुरू होत आहेत.
विद्यापीठाने अत्यंत अभिनव अशी ही योजना विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे.(14 library in kbcnmu use full for competitive exam jalgaon news)
विद्यापीठाने सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात बहिणाबाई अभ्यासिका सुरू करण्याची योजना मांडली होती. ग्रामपंचायत/ नगरपंचायत हद्दीतील महाविद्यालयांत ही अभ्यासिका सुरू केली जावी, अशी विद्यापीठाने कल्पना मांडली.
महाविद्यालयातील ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय सेवांमध्ये संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता आवश्यक असणाऱ्या बाबींचा विचार करून महाविद्यालयांत स्वतंत्र वाचन कक्षाची निर्मिती करण्यात यावी आणि त्या कक्षाला बहिणाबाई अभ्यासिका हे नाव देण्यात यावे, असे विद्यापीठ अधिकार मंडळाने ठरविले. त्यासाठी विद्यार्थी विकास विभागाने महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविले होते.
या महाविद्यालयांची निवड
एकूण ३० प्रस्ताव विद्यापीठाला प्राप्त झाले. नियमावलीनुसार १४ महाविद्यालयांची निवड करण्यात आली. त्यात त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट फार्मसी (पाळधी, जळगाव), श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय (मुक्ताईनगर), गरुड महाविद्यालय (शेंदुर्णी), कला व विज्ञान महाविद्यालय (भालोद), प. रा. हायस्कूल सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (धरणगाव), सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय (ऐनपूर), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (कुऱ्हा-काकोडा, ता. मुक्ताईनगर), उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय (दहिवेल), वाडिले महाविद्यालय (थाळनेर, ता. शिरपूर), देवरे महाविद्यालय (म्हसदी, ता. साक्री), गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (नगाव, धुळे), साईबाबा भक्त मंडळ संचलित कला महाविद्यालय (म्हसावद, ता. शहादा), रूरल फाउंडेशन संचलित वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय (अक्कलकुवा), लोकनेते माणिकराव गावित महाविद्यालय (विसरवाडी, ता. नवापूर) यांचा समावेश आहे.
श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर आणि गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी येथील अभ्यासिकांचे उद्घाटन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते झाले. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे उपस्थित होते.शेंदुर्णी येथील कार्यक्रमास प्राचार्य साळुंखे उपस्थित होते. खडसे महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमास रोहिणी खडसे, प्राचार्य हेमंत महाजन, सिनेट सदस्य दिनेश चव्हाण उपस्थित होते. गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नगाव येथील अभ्यासिकेचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्राचार्य एस. आर. पाटील, सिनेट सदस्य नितीन ठाकूर, प्राचार्य के. बी. पाटील उपस्थित होते.
प्रत्येकी ६० हजारांचे अनुदान
विद्यापीठाकडून या अभ्यासिकेसाठी एका महाविद्यालयास दरमहा पाच हजार याप्रमाणे वर्षाकाठी ६० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. या अभ्यासिकेत महाविद्यालयाकडे स्पर्धा परीक्षांची पुरेशी पुस्तके, मासिके आणि वृत्तपत्रे उपलब्ध असणे गरजेचे आहे. अभ्यासिकेची वेळ सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत असेल.
विद्यार्थ्यांसाठी पुरेसे फर्निचर, आवश्यक पंखे, बाक/टेबल-खुर्ची, वीजपुरवठा, स्वच्छ पिण्याचे पाणी असणे गरजेचे आहे. महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत विनामूल्य प्रवेश राहील. महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेत प्रवेश हवा असल्यास नाममात्र शुल्क घेऊन प्रवेश देण्याचा निर्णय महाविद्यालय आपल्या स्तरावर घेऊ शकते. विद्यार्थ्यांचे उपस्थितीपत्रकही त्या ठिकाणी ठेवले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.