Teachers and parents taking injured students in an ambulance after being attacked by monkeys at Kendriya Vidyalaya in Ordnance Factory Colony  esakal
जळगाव

Jalgaon News : माकडांच्या हल्ल्यात 14 विद्यार्थी जखमी; वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथून जवळच असलेल्या आयुध निर्माणीच्या केंद्रिय विद्यालयाच्या प्रांगणात प्रार्थना सुरू असताना काही माकडांनी अचानक केलेल्या हल्ल्यात चौदा शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची घटना (ता. ४) सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. यापैकी एक गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचार्थ भुसावळ रवाना केले आहे.

वरणगावसह सर्वत्र ग्रामीण परीसरात माकडांचा हैदोस सुरू असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. (14 students injured in monkey attack in jalgaon news)

माकडांच्या हल्ल्यात बहुसंख्य ठिकाणी अनेकांवर हल्ले होऊन जीव गमवावे लागले आहेत. तर कित्येक गंभीर जखमी देखील झाले आहेत.

अशा घटना वारंवार सुरू असताना सोमवारी (ता. ४) आयुध निर्माणी वसाहतमधील केंद्रीय विद्यालयात शिक्षकांसह विद्यार्थी प्रार्थनेसाठी सकाळच्या सुमारास एकत्र जमले असता झाडावर असलेल्या माकडांनी अचानक धुडगूस घातला.

विद्यालयाच्या प्रांगणात प्रार्थनेत मग्न असलेले गौरी गवळी, जान्हवी मराठे, वैष्णवी सोनवणे, दिव्या पाटील, प्रशिक सोनवणे, नक्षत्रा मोरे, साहिल सुरवाडे, कांचन पाटील, रक्षिता सोनवणे, खुशी भोळे,करूणा जैन, अक्षरा गोखले, अनुल्या कुमारी, स्वरा माळी सर्व आठ ते पंधरा वयोगटातील यांच्यावर माकडाने अचानक हल्ला चढवला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शाळेतील शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही किरकोळ जखमी विद्यार्थ्यांवर प्रथोमपचार करून घरी जाण्यास सांगितले. तर करुणा जैन हिच्या हाताला गंभीर दुखापत असल्याने तिला भुसावळ येथील खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

उपप्रबंधकांकडून तत्काळ दखल

या घटनेची माहिती मिळताच उपप्रबंधक व जनसंपर्क अधिकारी महेश शिंदे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत वरिष्ठांनी वन विभागाचे जळगाव येथील जिल्हा वनपाल ए. प्रवीण व मुक्ताईनगर येथील वनक्षेत्रपाल ऋपाली शिंदे यांना संपर्क करून घडलेल्या घटनेची माहिती देत वन्य प्राणी व माकडांच्या अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने वन्यप्राणी व माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group: अदानी 6 हजार कोटींना विकत घेणार 90 वर्षे जुनी कंपनी, काय आहे खास ?

IND vs BAN 1st Test : Jasprit Bumrah चा चेंडू सोडण्याची चूक अन् बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल; रचले गेले ५ मोठे विक्रम

Kashedi Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील एक भुयारी मार्ग आजपासून बंद; काय आहे कारण?

CM Eknath Shinde : "सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

SCROLL FOR NEXT