drought sakal
जळगाव

Jalgaon Drought News : रावेर वगळता 14 तालुक्यांत दुष्काळाची पहिली कळ निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Drought News : जिल्ह्यातील रावेर वगळता अन्य १४ तालुक्यांमध्ये दुष्काळाची पहिली कळ निश्‍चीत करण्यात आली आहे. दुष्काळ आढावा बैठकीत यावर चर्चा करण्यात आली असून, सप्टेंबरअखेर दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. (14 talukas except Raver have first signs of drought jalgaon news)

जिल्ह्यात कमी झालेले पर्जन्यमान, धरणांमधील कमी पाणीसाठा, पीक परिस्थिती याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. ८) दुष्काळ आढावा बैठक झाली. जलसंपदा विभाग, टंचाई, भूजल, महसूल या विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. शासनातर्फे दरवर्षी नजर, सुधारीत आणि अंतीम आणेवारी जाहीर केली जाते.

या आणेवारीवरून जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात येते. १५ सप्टेंबरला सुधारीत आणेवारी जाहीर होणार आहे. तत्पुर्वी ऑगस्टअखेर जिल्ह्यात पडलेल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळाचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात नियमीत पावसापेक्षा कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि पावसातील खंड हे प्रमाण लक्षात घेऊन दुष्काळाची पहिली कळ निश्‍चीत करण्यात येते. रावेर तालुका वगळता इतर सर्व १४ तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने या तालुक्यांमध्ये दुष्काळाची पहिली कळ निश्‍चीत करण्यात आली आहे. आता सप्टेंबरअखेर पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.

असे राहिले पावसाचे प्रमाण

जिल्ह्यात कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यात अमळनेर- ४४.४१ टक्के, भडगाव- ४०.८८, भुसावळ- ३०.६६, बोदवड- २५.२, चाळीसगाव- ४८.५८, चोपडा- ४९.७२, धरणगाव- ४५.२८, एरंडोल- ३१.६६, जळगाव- ३६.३६, जामनेर- ३६.५९, मुक्ताईनगर- ४.१८, पाचोरा- ३६.२४, पारोळा- २५.०६, यावल- २५.४७ असे पावसाचे प्रमाण राहिल्याने या तालुक्यांमध्ये दुष्काळाची पहिली कळ निश्‍चीत करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT