ZP School esakal
जळगाव

Jalgaon News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 15 कोटी! जिल्हा परिषदेच्या 15 शाळा होणार हायटेक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या १५ शाळा हायटेक होणार आहे. यासाठीच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी तब्बल १२ कोटी २३ लाख ५५ हजार ६४७ इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

भौतिक सुविधांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार वर्ग खोल्या, मुला- मुलींकरिता स्वतंत्र व पुरेशी स्वच्छतागृहे, पेयजल सुविधा व हँडवॉश स्टेशन, ग्रंथालय/वाचनालय, संगणक कक्ष, व्हर्चुअल क्लासरूमची सुविधा व शाळेला संरक्षण भिंत या सुविधा मंजूर निधीतून होणार असल्याने शिक्षणातून मुलांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास होण्यास मदत होणार आहे. (15 crore under dr Babasaheb Ambedkar Adarsh ​​School Scheme 15 schools of ZP will hitech Jalgaon News)

आदर्श मंजूर शाळा व निधी असा : पिलखेडा (ता.जळगाव) उच्च प्राथमिक शाळा (८४ लाख ७६ हजार), म्युनिसिपल स्कूल नंबर १९ उच्च प्राथमिक शाळा (६० लाख ४५ हजार), पाळधी (ता. धरणगाव) उच्च प्राथमिक शाळा (४५ लाख ६५ हजार),

पारंबी (ता. मुक्ताईनगर) उच्च प्राथमिक शाळा (एक कोटी ९७ लाख ७२ हजार), जुने गाव उच्च प्राथमिक शाळा (२ कोटी १लाख ५४ हजार), अमळनेर तालुक्यातील गडखांब (ता.अमळनेर) उच्च प्राथमिक शाळा (५० लाख ४५ हजार),

टोणगाव(भडगाव) यशवंत नगर उच्च उर्दू प्राथमिक शाळा (४५ लाख ६५ हजार), सिद्धेश्वर - वरणगाव (ता.भुसावळ) उच्च प्राथमिक शाळा (८८ लाख ८ हजार), कोल्हाडी (ता.बोदवड) उच्च प्राथमिक शाळा (५६ लाख ६६ हजार), माळशेवगे (ता. चाळीसगाव) उच्च प्राथमिक शाळा (४७ लाख ४५ हजार), गरताड (ता.चोपडा) उच्च प्राथमिक शाळा (७० लाख ४५ हजार),

विखरण (ता.एरंडोल) उच्च प्राथमिक शाळा (३३ लाख ४९ हजार), तोंडापूर (ता.जामनेर) उर्दू उच्च प्राथमिक शाळा (६० लाख १६ हजार ), पुनगाव (ता.पाचोरा)उच्च प्राथमिक शाळा (९५ लाख २६ हजार),

विचखेडे (ता.पारोळा)उच्च प्राथमिक शाळा (८५ लाख ७३ हजार) असे एकूण १५ शाळांच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी तब्बल १२ कोटी २३ लक्ष ५५ हजार ६४७ इतका निधी मंजूर निधी मंजूर करण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी शासन स्तरावर प्रस्ताव सादर केला होता.

"विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयातील अध्ययन फलनिष्पत्तीसह त्यांना सध्याच्या स्पर्धात्मक युगात विविध आव्हानांना सामोरे जाता यावे. त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यांना विविध सहशालेय उपक्रमात प्रावीण्य मिळवून देण्यासाठी.विविध क्षेत्रातील कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळा आदर्श ठरतील, अशी खात्री आहे."

- गुलाबराव पाटील, पालकमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT