15 lakhs for loss of legs and 3 lakhs for property loss from national people court jalgaon news esakal
जळगाव

National People Court: 44 पायऱ्या उतरून न्यायालय आले पीडितांकडे; पाय गमावलेल्यास 15 लाख, जायबंदीस 3 लाखांची भरपाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अपघात घडल्यापासून जो याचक म्हणून आर्जव करतोय आणि सर्वच ठिकाणी निराशा पदरी पडतेय, अशा दुःखितांसाठी चक्क न्यायालयच ४४ पायऱ्या उतरत भरपाई देण्यास आले. पीडितांची आस्थेवाईकपणे चौकशी केली अन्‌ धनादेश देऊन सांत्वनही केले.

पूज्य साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म...’ या काव्यपंक्तींचा प्रत्ययच शनिवारी (ता. ९) जिल्‍हा न्यायालयात दोन वेगवेगळ्या घटनांतून आला. (15 lakhs for loss of legs and 3 lakhs for property loss from national people court jalgaon news)

अपघातात पाय गमावलेल्या कैलास इंगळे यांच्याशी चर्चा करताना न्या. एस. पी. पवार व मान्यवर.

अपघातामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या जखमीला घेऊन त्याचे कुटुंबीय लोकअदालतीत आले होते. तर, दुसऱ्या खटल्यात अपघातात पाय गमावलेल्या एका गृहस्थास व्हिलचेअरवर न्यायालयात आणण्यात आले.

पहिल्या घटनेत सोपान भादू रोटे (वय ६५, रा. नशिराबाद) यांचा बोलेरो कारचालकाने निष्काळजीपणे भर रस्त्यात कारचा दरवाजा उघडल्याने झालेल्या अपघाताच्या खटल्यात न्या. जयदीप मोहिते यांच्या पॅनलचे न्यायालय जखमीपर्यंत आले. चौकशीनंतर विमा कंपनीस सूचना देत, तत्काळ तीन लाख १५ हजारांचा धनादेश रोटे कुटुंबीयांना सोपविला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विधी सेवा प्राधिकरणचे न्या. एस. पी. सय्यद, विमा कंपनीचे अॅड. प्रसाद गोडबोले, सरकारी वकील अब्दुल कादीर, ॲड. सुनील पाटील यांच्यासह कर्मचारी या वेळी उपस्थित होते. तर, दुसऱ्या घटनेत पिंपळगाव खुर्द (ता. वरणगाव) येथील कैलास रामदास इंगळे (४५) व त्यांचा मुलगा गौरव (१९) हे पिता-पुत्र अपघातात जखमी झाले होते.

श्री. इंगळे यांना मल्टिपल फ्रॅक्चर्समुळे त्यांचा पाय कापावा लागला. न्या. एस. पी. पवार यांना त्यांची अवस्था कळताच त्यांनीही थेट तळमजल्यावर पोहोचत आस्थेवाईकपणे चौकशी करून व सविस्तर माहिती जाणून घेत विमा कंपनीला जखमी मुलासाठी एक लाख, तर इंगळे यांना १२ लाख अशी एकूण १३ लाखांची नुकसान भरपाई जागेवरच देण्यास भाग पाडले. या वेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. सय्यद, ॲड. चौगुले, ॲड. प्रसाद गोडबोले आणि ॲड. एम. एस. चौधरी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfers: निवडणूक आयोगानं झापल्यानंतर आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या! लवकरच जाहीर होणार निवडणूक?

विधानसभेसाठी मनसेच्या तयारीपासून ते टीम इंडियातील खेळाडूला शिक्षेपर्यंत, वाचा आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan नोव्हेंबरमध्ये समोरासमोर? जाणून घ्या कोणती स्पर्धा अन् कुठे भिडणार

Nana Patole: हिंदुत्वाचं राजकारण नुसतं मतांसाठी करणार का? महायुतीवर नाना पटोले संतापले, काय म्हणाले?

Diwali Special Train: दसरा अन् दिवाळीसाठी मुंबईहून विशेष ट्रेन, जाणून घ्या २६ फेऱ्यांची माहिती

SCROLL FOR NEXT