Jalgaon Crime : येथे गुरुवारी (ता. १७) रात्री गोमांस वाहून नेणारा ट्रक पेटविल्याप्रकरणी १९ जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, १५ जणांना अटक करण्यात आली आहे.
या वेळी झालेल्या दगडफेकीत एक अधिकारी व एक हवालदार जखमी झाले आहेत. (15 people arrested in case of truck burning in Paldhi jalgaon crime)
गुरुवारी रात्री ट्रक (यूपी ९३, एटी ८१३५) मधून गोमांस वाहून नेले जात होते. पाळधी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतल्यानंतर येथील वळण रस्त्याजवळ जमलेल्या नागरिकांनी तो पेटवून दिला व पोलिस वाहनांवर दगडफेक केली. दगडफेकीत वाहना (एमएच १९, सीझेड ६१८२)चे नुकसान झाले होते. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रात्रीच दंगा नियंत्रण पथक दाखल झाल्याने शांतता पसरली. या प्रकरणी पोलिसांनी रात्रीच धरपकड सुरू केली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यात भूषण पावबा पाटील, जनार्दन गुलाब सोनवणे, गोपाल सुरेश चौधरी, भगवान सोमनाथ चौधरी, समाधान चेतन चौधरी, विकास राजेंद्र सोनवणे, मयूर अनिल पाटील, रुपेश प्रभाकर माळी, सुशील संजय नन्नवरे, रामेश्वर भगवान माळी, रत्नदीप मनोज नन्नवरे, पंकज लोटन चौधरी, अक्षय तंटू अहिरे, सागर जितेंद्र नन्नवरे (सर्व रा. पाळधी), तसेच प्रमोद युवराज कोळी (रा. बांभोरी) यांना अटक करण्यात आली असून, त्यांना शुक्रवारी (ता. १८० धरणगाव न्यायालयात हजर केले असता, भूषण पाटील, जनार्दन सोनवणे, गोपाल चौधरी, प्रमोद कोळी यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत परिक्षाविधीन पोलिस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार व पोलिस हेडकॉन्स्टेबल गजानन अर्जुन महाजन जखमी झाले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.