पाचोरा (जि. जळगाव ) : गुढे (ता. भडगाव) येथील मूळ रहिवासी व पाचोरा येथील आरसीएफचे (RCF) निवृत्त विपणन व्यवस्थापक के. एम. पाटील यांचा नातू यशराज याने
कोरोनाकाळाचा संधीचा फायदा घेत आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन तब्बल एक नव्हे तर सतत तीन वर्ष विश्वविक्रम नोंदीत आपले नाव झळकवले आहे. (150 satellites Projected in space through Hybrid Sound by youth scientist jalgaon news)
तामीळनाडू राज्यातील रामेश्वरम् येथील डॉ. अब्दुल कलाम इंटरनॅशल फाउंडेशन स्पेस झोन इंडियाच्या मार्टिन ऑर्डर ऑफ चॅरिटीने १९ फेब्रुवारी २०२३ ला ममल्लापूरम् येथे एकाच रॉकेटमध्ये १५० उपग्रह सोडण्याचा विक्रम नोंदविला. या यशस्वी प्रक्षेपण मोहिमेत पाचोऱ्याच्या यशराज गुढेकर या युवा शास्त्रज्ञाचा समावेश होता.
या विश्वविक्रमासाठी संपूर्ण भारतातून ५००० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विविध परिक्षा, मुलाखती व कार्यशाळेच्या निकषातून १०० विद्यार्थी निवडण्यात आले. त्यात ४० विद्यार्थी महाराष्ट्रीयन होते.
या विद्यार्थ्यांना उपग्रह निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. या युवा संशोधकांनी १०० उपग्रह तयार केले करून रामेश्वरम् परिसरात फुग्याद्वारे ३०० मीटर उंचीवर उडवून त्यांचा अभ्यास करण्यात आला.
त्यानंतर ८ सेमी आकारमानाचे पिको नावाचे १५० सक्रिय उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना निश्चित केली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी पहाटेपासूनच महाराजांचा जयघोष करत सकाळी ८.१८ मिनिटांनी तिरुविदंथाई बीच, ममल्लापूरम् येथे तेलंगणाचे राज्यपाल आणि पाँडेचरीचे लेफ्टनंट गव्हर्नर डॉ. तमिलिसाई सुंदरराजन, पाँडेचरी विधानसभेचे अध्यक्ष अण्णाम्मी एम्बलम,
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाईट लाँच व्हेईकल मिशनचे पद्मश्री पुरस्कारप्राप्त इस्त्रोचे डॉ. एपीजेएम नाजेमा मरईकायर, डॉ. लीमा रोज मार्टिन, डॉ. जोस चार्ल्स मार्टिन, डॉ. सुलतान अहमद इस्माईल, डॉ. बी. वेंकटरामन, डॉ. आर. राजेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली कामराजर मणिमंडपम पांडेचरी येथे भारतातील पहिले हायब्रीड रॉकेट प्रक्षेपण केले. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दुल कलामजी यांची वेशभूषा करून राष्ट्रध्वज उंचावत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला.
१५० उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारतीय बनावटीच्या रॉकेटमध्ये दोन प्रकारचे इंधन वापरले. संपूर्ण जगात असे स्टुडंट मिशन आजपर्यंत न झाल्याने याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या रॉकेट प्रक्षेपणावर नजर ठेवण्यासाठी प्रत्यक्ष इस्त्रोचे माजी संचालकसह डॉ. आनंद मॉलिगंम, इस्त्रोचे वैज्ञानिक डॉ. गोकुळ उपस्थित होते.
कुटुंबीयांचे प्रोत्साहन
या मिशनसाठी ‘एकेआयएफ’चे सचिव मिलिंद चौधरी, समन्वयक मनीषा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या मोहिमेत सहभागी यशराज गुढेकरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोरोनाकाळात अनेकांचे शैक्षणिक करिअर उद्ध्वस्त झाले असताना यशराजने रामेश्वरम् येथील संस्थेच्या माध्यमातून ३ वर्षापूर्वी ५ वर्ल्ड रेकॉर्ड करणारा उपग्रह तयार केला होता.
तद्नंतर मागील वर्षी २०२२ पुणे येथील ऑनलाइन वैज्ञानिक प्रदर्शनात यशराजला द्वितीय क्रमांक मिळाला होता. आता भारतीय बनावटीच्या पहिल्या हायब्रीड साऊंड रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपण मोहिमेत त्याचा सहभाग कौतुकास्पद ठरला आहे. शिक्षिका कल्पना पाटील व योगेंद्र पाटील यांच्यासह आजोबा के. एम. पाटील, आजी कुमुदिनी पाटील यांचे प्रोत्साहन लाभत असल्याचे यशराजने स्पष्ट केले.
रॉकेटमधील इंधन संपले, अन्...
या मोहिमेतील पाचोरा येथील यशराज योगेंद्र गुढेकर याने सांगितले, की ३७९ सेकंदानंतर रॉकेटमधील इंधन संपले आणि रॉकेटने १५० उपग्रह अवकाशात सोडले. सर्व उपग्रह पॅराशूटच्या सहाय्याने अवकाशातील सबऑर्बिटमध्ये तरंगू लागले. त्याचवेळी रॉकेटच्या आतील भागातील पॅराशूट उघडला गेला आणि त्याच्या सहाय्याने रॉकेटचा परतीचा प्रवास सुरू झाला.
प्रक्षेपण स्थळापासून ६.५ किमी अंतरावर रॉकेट समुद्रात उतरले. जीपीएस सिस्टिमच्या साहाय्याने रॉकेट कुठे उतरले? याची माहिती मिळाली. त्याआधारे कोस्ट गार्डच्या मदतीने रॉकेट परत हस्तगत करण्यात आले. या रॉकेटचा उपयोग पुढील मिशनसाठी करता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.