Family Reconciliation Judge M. S. Qazi, Adv. Bhushan Mane, Adv. Vedavrata Kate, Adv. Swati Technology, Advt. Akil Pinjari. esakal
जळगाव

National People Court : लोकअदालतीत 156 प्रकरणे निकाली; पारोळ्यात सात कुटुंबांचे मनोमिलन

सकाळ वृत्तसेवा

National People Court : येथील न्यायालयात शनिवारी (ता.९) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत सात कुटुंबांचे मनोमिलन करण्यात आले. या न्यायालयात दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे मिळून एकूण ठेवलेले ५ हजार २७ प्रकरणांपैकी १५६ प्रकरणे निकाली निघून त्यात एकूण १ कोटी ३ लाख ७ हजार ३६९ रूपये वसूल झाले.

या लोकदालतीचे पॅनलप्रमुख तसेच प्रमुख न्यायाधीश एम. एस. काझी हे होते तर पॅनल पंच म्हणून ॲड. स्वाती शिंदे यांनी काम पाहिले. या राष्ट्रीय लोकन्यायालयात दाखल ३३३ दिवाणी प्रकरणांपैकी नऊ प्रकरणे निकाली निघाली. (156 cases were settled in People Court jalgaon news)

यात ११ लाख ४४ हजार ११२ रुपये तडजोडीअंती वसूल झाले तर फौजदारी २१२ प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी ३२ प्रकरणे निकाली निघून १८ लाख ५५ हजार रुपये तडजोडीअंती वसूल झाले असे एकूण ५४५ पैकी ४१ प्रकरणे निकाली निघून २९ लाख ९९ हजार ११२ रुपये तडजोडीअंती वसूल झाले.

यावेळी ज्येष्ठ विधित्ज्ञ अनिलकुमार देशपांडे, ए. आर. बागूल, आनंदराव पवार, ॲड. ए. डी. पाटील, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दत्ताजी महाजन, सचिव ॲड. गणेश मरसाळे, ॲड. तुषार अशोक पाटील, भूषण माने, ए. डी. कश्यप, तुषार पाटील, सतीश पाटील, एच. एम. कुलकर्णी, अकील पिंजारी, वेदव्रत काटे, सतीश पाटील, आर. टी. पाटील, पराग शिरसमणे, कृतिका आफ्रे, वि़द्या सूर्यवंशी, पूनम पाटील, केस वॉच जितेंद्र बाविस्कर यासह वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लोकअदालत यशस्वितेसाठी सहायक अधीक्षक बी. एम. भोसले, वरिष्ठ सहाय्यक एन. आर. पिंपळे, कनिष्ठ सहाय्यक पंकज महाजन, लघुलेखक एम. एस. पाटील, वरिष्ठ लिपिक एम. एस. महाजन, कनिष्ठ लिपिक टी. एस. पवार, एम. डी. बागड, शिपाई सी. बी. पवार, एस. एम. धनगर, सी. एस. गावंडे आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यासह पक्षकार, बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बॅंक, सेंट्रल बँक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बीएसएनएल, ग्रामपंचायत आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

बँक, ग्रामपंचायतींची सर्वाधिक प्रकरणे

दरम्यान, या राष्ट्रीय लोकअदालतीत बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बॅंक, सेंट्रल बँक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बीएसएनएल, ग्रामपंचायत या विभागांनी देखील आपली दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. या एकूण ४ हजार ४८२ प्रकरणांपैकी ११५ प्रकरणे निकाली निघून त्यात ७३ लाख ८ हजार २५७ रुपये तडजोडीअंती वसूल झाले आहेत. न्यायालयात दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे मिळून एकूण ठेवलेले ५ हजार २७ प्रकरणांपैकी १५६ प्रकरणे निकाली निघून त्यात एकूण १ कोटी ३ लाख ७ हजार ३६९ रूपये वसूल झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: याला म्हणतात नियती! ज्यांना पवारांनी घरी बसवलं, त्यांनाच आता विधानसभेत पाठवणार...

Peacock: आश्चर्य! मोराच्या वर्तनात कमालीचे बदल, साडेसहा हजार फुटांवर घेतली भरारी; अभ्यासकांनी व्यक्त केली 'ही' भीती

IND vs PAK: सामना जिंकला, मात्र एक चूक अन् ICCकडून शिक्षा, टीम इंडियाच्या खेळाडूनं नेमकं काय केलं?

Raj Thackeray : विधानसभा जिंकण्यासाठी तयार रहा! राज ठाकरेंनी घेतला पश्‍चिम महाराष्ट्राचा आढावा

Latest Maharashtra Live News Updates : मुख्य सचिव आणि डीजीपी यांना राजभवनात बोलावले

SCROLL FOR NEXT