Election of Gram Panchayat esakal
जळगाव

Jalgaon Gram Panchayat : 167 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू; 128 रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Gram Panchayat : जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या १२८ रिक्त पदांसाठी निवडणुका होणार आहेत. ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यास २० ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.

जळगाव तालुक्यात एकूण सार्वत्रिक निवडणुका १५ ग्रामपंचायतीत, तर पोटनिवडणुका दोन ग्रामपंचायतीत होणार आहे. आतापर्यंत एकही अर्ज दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. (167 Gram Panchayat election process started jalgaon news )

...असा आहे निवडणूक कार्यक्रम

१६ ते २० ऑक्टोबर - अर्ज दाखल करणे

२३ ऑक्टोबर - अर्जांची छाननी

२५ ऑक्टोबर - अर्ज माघारी, चिन्हवाटप

मतदान - ५ नोव्हेंबर

उमेदवारांना ही कागदपत्रे आवश्‍यक

- नामनिर्देशनपत्र नमुना अ (नियम ८)

(सर्व फॉर्मवर स्वाक्षरी असणे बंधनकारक)

- उमेदवाराने करावयाचे घोषणापत्र क्रमांक १

(वयाबाबत ग्रा. पं. ठेकेदार नसलेबाबत व थकबाकी नसलेबाबत)

- उमेदवाराने करावयाचे घोषणापत्र क्रमांक २

(जातप्रवर्गाबाबत जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र)

- नावात बदल (स्त्री असेल तर) शपथपत्र

-परिशिष्ट - २

(अपराधाबद्दल, जंगम मालमत्ता, दायित्वबाबत, शैक्षणिक अर्हता व पडताळणीचे घोषणापत्र)

-अपत्याचे घोषणापत्र

(१२ सप्टेंबर २००१ नंतरच्या अपत्यासह संख्या दोनपेक्षा जास्त नसावी)

- शौचालय असलेबाबत स्वयंघोषणापत्र

- ग्रामपंचायत ठेकेदार नसलेबाबत स्वयंघोषणापत्र

- जातीचा दाखला

- जात वैधता प्रमाणपत्र

- हमीपत्र (परिशिष्ट- २) खर्चाचा दैनंदिन अहवाल

- निवडणूक खर्च १ महिन्याचे आत देणेबाबत हमीपत्र

- चिन्हांच्या प्राधान्यक्रमांचा नमुना (नमुना -अ)

- मतदार यादीची प्रत

(त्याच प्रभागात नाव नसल्यास) प्रमाणित प्रत

- नवीन बँक खाते पासबुक झेरॉक्स

- दोन फोटो व नमुना स्वाक्षरी (उमेदवार)

- वयाचा पुरावा

- ओळखीचा पुरावा

- शैक्षणिक अर्हता

- रहिवासी दाखला (वास्तव्याचा दाखला)

- अनामत रक्कम भरल्याची पावती

निवडणुका होणारे तालुके व ग्रामपंचायती अशा

तालुका - सार्वत्रिक निवडणुका - पोटनिवडणुका

पारोळा - ११ - ९

भडगाव - ८ - ५

अमळनेर - १४ - ११

चाळीसगाव - १२ - १०

भुसावळ - ७ - ४

पाचोरा - ४ - १४

एरंडोल - ७ - ३

रावेर - १३ - २१

जामनेर - १७ - २०

चोपडा - २२ - ४

जळगाव - १५ - ४

बोदवड - ५ - १

मुक्ताईनगर - ४ - ४

यावल - १० - १५

धरणगाव - १८ - ३

एकूण - १६७ - १२८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT