Agriculture Department esakal
जळगाव

Jalgaon News : चाळीसगाव कृषी विभाग ‘सलाईन’वर; रिक्त पदांमुळे अडचणी

दीपक कच्छवा

Jalgaon News : चाळीसगाव तालुक्यातील कृषी विभागात कर्मचाऱ्यांची वनवा असून, तालुक्यात जवळपास ४१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कृषी कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडत आहे.

तालुक्यात चार कृषी मंडळे असून, या मंडळांत सर्वाधिक ३२ कृषी सहाय्यकांची पदे रिक्त आहेत तर तब्बल १३७ गावांचा भार अवघ्या १७ कृषी सहाय्यक सांभाळत आहेत. यामुळे रिक्त पदांची संख्या भरण्यासाठी शासनाला मुहूर्त मिळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तालुका कृषी विभागात विविध पदे रिक्त असल्याने कृषी विभागाच्या योजनांची माहिती ग्रामस्थांना पोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. (17 agricultural assistants are responsible for 137 villages in taluka jalgaon news)

कृषी विभागात ४१ विविध पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांना योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळत नसल्याने कृषी विभागातील मंडळ, कृषी अधिकारी यांच्या पदासह कृषी सहाय्यकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, अशी मागणी होत आहे.

तालुका कृषी विभागात महत्त्वाचे मंडळातील दोन मंडळ कृषी अधिकारी यांचे पदच रिक्त असल्याने येथे शेतकऱ्यांसह येथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना काम करताना खूपच अडचणी येत आहेत.कृषी विभागात सद्यस्थितीत १७ कर्मचाऱ्यांवर १३७ गावांचा भार आहे. शेतकऱ्यांना पाहिजे तशा योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचत नसल्याचे चित्र दिसत आहे.

९१ हजार हेक्टर क्षेत्र

तालुक्याचे एकूण ९१ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यात यावर्षी पन्नास टक्के कपाशी लागवड झाली आहे. मात्र तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी पुरता हाताश झाला आहे. अशातच बागायती पिके सध्या थोड्याफार पाण्यावर तग धरून आहेत.

मागच्या वर्षी बोंडआळीच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी अजूनही बोंडआळी येते की काय? या भीतीत जगत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या विविध योजना आजही शेतकऱ्यांच्या बांधावर पोचविण्यासाठी तालुका कृषी विभागात मनुष्यबळ कमी आहे. तालुक्यातील कृषी विभागात रिक्त पदे भरण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

योजनांचा वाढतोय ताण

पीएम किसान योजना, पीकविमा, दुष्काळी परिस्थितीचे सर्वेक्षण, कीडरोग सर्वेक्षण, फळबाग लागवड व मस्टर काढणे, शेतीशाळा व कार्यालयीन कामकाजाचा ताण या १७ कृषी सहाय्यकांवर पडत आहे. यामुळे ते देखील ताणतणावात राहत असल्याचे चित्र दिसत आहे.

विविध पदांसोबत कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, सुपरवायझर असे विविध एकूण ६८ पदे आहेत. यामध्ये २७ पदे भरली असून, यात ४१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांना कामाचा ताण वाढल्याचे दिसून येत आहे. या कृषी सहाय्यकांवरील वाढलेला कामाचा ताण पाहून लवकरात लवकर भरती करावी, अशी मागणी होत आहे.

"रिक्त पदे भरण्याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्या संदर्भात पुढील कार्यवाही सुरू आहे. आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. रिक्त असलेल्या जागा डिसेंबरअखेर नवीन भरती प्रक्रिया राबवून भरण्याचे शासनाचे नियोजन आहे." - किशोर हडपे, चाळीसगाव तालुका कृषी अधिकारी

रिक्त असलेली पदे

मंडळ कृषी अधिकारी------- ०२

कृषी सहाय्यक------------३१

अनुरेखक----------------०४

शिपाई ------------- ०४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT