girl harrasment  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मुलासह आईवडिलांकडून लग्नाचे वचन अन विद्यार्थिनीवर सलग....गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या वाढीव हद्दीत राहणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थिनीवर लग्नाचे आमिष दाखवून सलग दोन वर्षे अत्याचार करण्यात आला.

अत्याचारातून गर्भवती राहिल्यानंतर पीडितेचा अघोरी उपचारांनी गर्भपात (Abortion) करवून तिचे लग्न ठरविण्यात आले. (18 year old student was raped for two years after being lured into marriage jalgaon crime news)

मात्र, ठरलेल्या लग्नतिथीला नवरदेव पोहोचलाच नाही. परिणामी, फसवणूक आणि अत्याचारप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या वाढीव हद्दीतील अठरा वर्षीय विद्यार्थिनीशी एरंडोल शहरातील इस्लामपुरा भागात राहणाऱ्या हसन अस्लम मोमीन याची ओळख झाली. त्यावेळी ती अल्पवयीन होती. ओळखीचा फायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखविले.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित तरुणी गर्भवती राहिली. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर संशयित हसन अस्लम मोमीन, त्याची आई मुन्नी आणि अस्लम मोमीन या तिघांनी गर्भपात करण्यासाठी कॉफी आणि पपई खाऊ घातली. यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याची तारीख निश्‍चित केली.

मात्र, लग्नावेळी हजर झाले नाही व फसवणूक केली. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने रविवारी (ता. १२) रात्री अकराला दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात संशयित हसन मोमीन, त्याची आई मुन्नी आणि अस्लम मोमीन या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT