Jalgaon News : उच्च न्यायालय विधी सेवा छत्रपती संभाजीनगर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाने तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील फिरत्या लोकन्यायालयात तडजोडीने प्रलंबित ३० व वादपूर्व १५५ असे एकूण १८५ खटले निकाली काढण्यात आले असून, १० लाख २५ हजार ९७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (185 cases were settled in Pimpalgaon Mobile People Court jalgaon news)
पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या प्रांगणात फिरते लोकन्यायालय नुकतेच झाले. यात संक्षिप्त फौजदारी खटले, धनादेश अनादर, वैवाहिक प्रकरणे, प्रलंबित खटले, ज्यात कायद्याने तडजोड शक्य आहे, असे दिवाणी व फौजदारी खटले ठेवण्यात आले. पॅनलप्रमुख म्हणून न्या. जी. बी. औंधकर होते. पंच न्यायाधीश म्हणून अॅड. गोपाल पाटील यांनी काम पाहिले.
याप्रसंगी न्या. मंगला हिवराळे, न्या. एल. व्ही. श्रीखंडे, ॲड. प्रवीण पाटील, ॲड. मंगेश गायकवाड, ॲड. राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते. या प्रसंगी ॲड. प्रवीण पाटील यांनी लोकन्यायालय गरज व फायदे या विषयावर, ॲड. एस. पी. पाटील यांनी मादक पदार्थ बळी धोका व निर्मूलन या विषयावर, ॲड. सुनील पाटील यांनी गर्भनिदान जाणीव या विषयावर, महेंद्र वाघमारे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा या विषयावर, न्या. औंधकर यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले व ३० एप्रिलला होणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
याप्रसंगी ॲड. डी. जे. पाटील, ॲड. डी. आर. पाटील, अॅड. बापू महाजन, ॲड. मदन मोरे, अँड. राजेंद्र परदेशी, ॲड. अरुण भोई, अॅड. अनिल पाटील, ॲड. नीलेश सूर्यवंशी, ॲड. पी. बी. पाटील, ॲड. रणसिंग राजपूत, ॲड. अनुराग काटकर, ॲड. शांतिलाल सैंदाणे, ॲड. कविता रायसाकडा, ॲड. भाग्यश्री महाजन, अँड. माधुरी जाधव, ॲड. ज्योती पाटील, ॲड. एन. एस. महाजन, ॲड. अविनाश सुतार, ॲड. डी. पी. पाटील, ॲड. नरेंद्र डाकोरकर, ॲड. कैलास सोनवणे, ॲड. संदीप पाटील, ॲड. रवींद्र पाटील, ॲड. चंदन राजपूत,
ॲड. प्रशांत नागणे, ॲड. प्रशांत भावसार, ॲड. गोसावी, ॲड. लक्ष्मीकांत परदेशी, ॲड. ईश्वर जाधव, ॲड चंद्रकांत पाटील, ग्रामसेवक श्री. परदेशी, पोलिस कर्मचारी राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, रणजित पाटील, न्यायालयीन कर्मचारी जी. आर. पवार, संजीव ठाकरे, दीपक तायडे, विजय पवार, अमोल चौधरी, ईश्वर पाटील, नितीन पाटील आदी उपस्थित होते. अॅड. प्रवीण पाटील यांनी प्रास्ताविक केले. ॲड. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. संजीव नैनाव यांनी आभार मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.