पारोळा (जि. जळगाव) : जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पारोळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय व पारोळा वकील संघातर्फे बहादरपूर (ता. पारोळा) येथे नुकतेच फिरत्या न्यायालयाचे (Mobile Court) आयोजन करण्यात आले. पारोळा न्यायालयाचे न्यायाधीश के. के. माने व एम. एस. काझी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी दोन फौजदारी खटले निकाली काढण्यात आले. (2 criminal cases settled in Bahadurpur mobile court Jalgaon News)
याप्रसंगी न्यायाधीश काझी यांनी जळगाव जिल्ह्याची पार्श्वभूमी सांगताना झाशीच्या राणीच्या माहेरकर्त्यांचा विशेष उल्लेख केला. महिलांचे व बालकांचे अधिकार आणि हक्कांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. न्यायाधीश भूषण माने यांनी मृत्यूपत्र व त्या संदर्भातील कायद्याबाबत मार्गदर्शन केले. आपल्या स्वतःच्या संपत्तीची वाटणी कशा प्रकारे करु शकतो, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. सतीश पाटील यांनी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियमासंदर्भात माहिती दली. विधितज्ज्ञ ए. आर. बागूल यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश माने यांनी फिरत्या न्यायालयाची संकल्पना स्पष्ट करताना या न्यायालयामुळे खटल्यांच्या निकालांना होणारा विलंब दूर होऊन आपली वेळ आणि पैशांची बचत होत असल्याचे सांगून या न्यायालयाचे महत्त्व सांगितले.
यावेळी पॅनल पंच म्हणून ॲड. हर्षल शर्मा व सचिन पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला बहादरपूरचे सरपंच भिकन पारधी, गोकूळ चौधरी, परेश चौधरी, अशोक चौधरी, ग्रामसेवक अरुण देशमुख, पारोळा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. भूषण माने, मिलिंद महाजन, हर्षल सोनवणे, सतीश पाटील, महेंद्र पाटील, विशाल महाजन यांच्यासह पक्षकार, ग्रामस्थ उपस्थित होते. भगवान चौधरी यांनी सूत्रसंचालन तर ज्ञानेश्वर पाटील यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी न्यायालयातील वरिष्ठ सहाय्यक के. जी कुमावत, कनिष्ठ सहाय्यक पंकज महाजन, लिपीक एम. एस. महाजन, एच. एस. सोनवणे, एम. डी. बागड, शिपाई सी. बी. पवार, आर. आर. भोई आदींचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.