Jalgaon News : महापालिका सतरा मजली प्रशासकीय इमारतीसह विविध प्रभाग कार्यालय, वाघूर पंपिंगचे एकूण दरमहा दोन ते अडीच कोटी रुपये वीज बिल अदा करीत असते.
महापालिकेच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीसह गोलाणी संकुल व इतर इमारतीवर सोलर यंत्रणा लावल्यास महापालिकेचा हा खर्च तर वाचेलच शिवाय वीज विक्री होऊन उत्पन्नही मिळेल परंतु महापालिका प्रशासन ठराव होऊन देखील सोलर यंत्रणा बसविण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर आली आहे. (2 crore electricity bill per month is being paid by municipality jalgaon news)
महापालिकेच्या शहरात सतरा मजलीसह मोठ्या प्रमाणावर स्वत:च्या इमारती आहेत. सतरा मजली व गोलाणी संकुलावरच सोलर यंत्रणा बसविल्यास महापालिका मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती करू शकते, त्यामुळे महापालिकेचा विजेचा खर्च वाचेलच परंतु अतिरिक्त वीज विकून महापालिकेला अधिक उत्पन्नही मिळू शकणार आहे.
याशिवाय महापालिकेने शहरातील शाळा इमारती, दवाखाने तसेच या इमारतीवर सोलर पॅनल बसविल्यास त्यापासूनही अधिक वीज निमिर्ती होवू शकते. मात्र ही यंत्रणा इमारतींवर बसविण्यात आलेली नसल्याने जळगाव महापालिकेचा वीज बिलावर मोठा खर्च होत आहे. साधारण: दरमहा दोन ते अडीच कोटी रुपयांचे वीज बिल द्यावे लागत आहे.
प्रस्ताव मंजूर पण अंमलबजावणी नाही
महापालिकेच्या महासभेत सतरा मजली इमारत व गोलाणी संकुलावर सोलर पॅनल यंत्रणा बसविण्याचा ठराव मंजूर झाला आहे. मात्र त्याची प्रशासनातर्फे अंमलबजावणीच करण्यात येत नाही. तत्कालीन आयुक्त डॉ.सतीश कुळकर्णी यांच्या काळातही त्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र त्याबाबत पुढील कार्यवाही काहीही झाली नाही.
त्यानंतर आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनीही याबाबत मध्यंतर कार्यवाही सुरू केली होती. परंतु ते पुन्हा थांबले आहे. त्यामुळे मात्र महापालिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
असा होतो वीज बिलावर खर्च
सतरा मजली इमारत : २ लाख १४ हजार ६३०
वाघूर पंपिंग स्टेशन : ८४ लाख ८४हजार १८०
उमाळा जलशुद्धीकरण केंद्र : ३ लाख २० हजार ५९०
लाठी शाळा प्रभाग कार्यालय : १४ हजार ५३०
महापालिका शिक्षण मंडळ : ३ हजार
आयुक्त निवास : ३ हजार
चेतनदास मेहता दवाखाना : १३ हजार
नानीबाई रूग्णालय : १६ हजार ६७०,
मुलतानी रूग्णालय : ६ हजार १८०
मो.युसूफ दवाखाना : ७५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.