2 people have been killed in different incidents in jamdi and Chinchkhede Shivar chalisgaon jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : खुनाच्या घटनांनी चाळीसगाव हादरले! वेगवेगळ्या घटनांत दोघांचा खून

दीपक कच्छवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील जामडी व चिंचखेडे शिवारात वेगवेगळ्या घटनांत दोघांचा खून झाला आहे.

जामडी येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा तर चिंचखेडे येथे एकाचा शेतकऱ्याचा लाकडी दांड्याने हल्ला करून व गळा आवळून खून करण्यात आला.

या दोन्ही घटनांमुळे तालुका हादरला असून, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (2 people have been killed in different incidents in jamdi and Chinchkhede Shivar chalisgaon jalgaon crime news)

चिंचखेडे येथे घडलेल्या घटनेत तालुक्यातील देवळी येथील राजेंद्र सुकदेव पाटील (वय ५५) यांचे कुटुंबीय देवळी गावातीलच विमलबाई रामलाल पाटील यांच्या चिंचखेडे शिवारातील शेतजमीन निमबटाईने गेल्या सात वर्षांपासून करीत आहेत.

या शेतात कांद्याचे पत्र्याचे शेड असून, तेथे जनावरे बांधलेली असल्याने शेतकरी राजेंद्र पाटील हे नेहमी रात्री झोपायला जात असत. दरम्यान, बुधवारी (ता. ७) रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे राजेंद्र पाटील हे शेतात झोपण्यासाठी गेले.

त्यानंतर गुरुवारी (ता. ८) सकाळी सातला देवळी गावचे पोलिस पाटील दिलीप दत्तू पाटील हे राजेंद्र पाटील यांच्या घरी गेले व त्यांचा मुलगा मुकेश यास तुझ्या वडिलांना कुणीतरी डोक्याला मारले आहे, लवकर चल असे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर मुकेश हा पोलिस पाटलांसमवेत दुचाकीवरून शेतात गेला असता वडील राजेंद्र पाटील हे ज्या पलंगावर झोपलेले होते तेथे जाऊन पाहिले असता राजेंद्र पाटील यांनी काहीएक हालचाल केली नसल्याचे दिसून आले. तर पलंगाच्या बाजूलाच रक्ताने माखलेली लाकडी दांडा आढळून आला.

मुलांने फोडला टाहो

वडिलांचा मृतदेह पाहताच मुलगा मुकेश याने एकच टाहो फोडला. मृत राजेंद्र पाटील यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार केलेले आढळले तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. तसेच गळा आवळल्याची खूणही दिसत होती. बाजूलाच एक दोरी पडलेली होती. राजेंद्र पाटील यांचा खून झाल्याची घटना समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिस पाटील यांनी मेहुणबारे पोलिसांना दिली.

पोलिसांनी तत्काळ धाव घेत घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, बुधवारी (ता.७) रात्री दहा ते गुरुवारी (ता.८) सकाळी सातच्या दरम्यान चिंचखेडे शिवारातील विमलबाई पाटील यांच्या शेतात राजेंद्र पाटील यांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने लाकडी दांड्याने मारून तसेच गळा आवळून जीवे ठार मारल्याप्रकरणी मुकेश राजेंद्र पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून नियोजित की चोरट्यांकडून?

मृत राजेंद्र पाटील यांच्या शेताच्या शेजारील शेतकरी गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास दूध काढल्यानंतर घराकडे येत असताना त्यांना राजेंद्र पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडच्या बाहेर तीन, चार कापूस गोण्या दिसल्या. या गोण्या बाहेर का आहेत म्हणून हा शेतकरी पाहण्यासाठी गेला असता रक्ताने माखलेली दोरी व दोन तीन लाकडे दिसून आली.

त्यामुळे राजेंद्र पाटील यांची हत्या ही कापूस चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांकडून झाली की अन्य कारणातून याचा पोलिस शोध घेत आहेत. गेल्या १९ मेस राजेंद्र पाटील यांच्या आईचे निधन झाले होते. त्या दु:खातून हे कुटुंब सावरत नाही तोच आज राजेंद्र पाटील यांच्या खुनामुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ठसे तज्ज्ञांना पाचारण

शेतकऱ्याच्या खुनाच्या घटनेने हादरलेल्या पोलिसांनी चोहोबाजूने तपास सुरू केला असून, जळगावहून फॅारेन्सिक लॅब अर्थात ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी करून ठसे घेतले.

दरम्यान, चिंचखेडे शिवारात शेतकऱ्याचा खून झाल्याची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख, मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांच्यासह कर्मचारी ठाण मांडून होते.

जामडीत धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला

दुसऱ्या घटनेत जामडी येथील गैबनशहा बाबा दर्गावर गुरुवारी (ता. ८) दुपारी तीनच्या सुमारास फकीर तरुण तरबेज शहा याकूब शहा याचा धारदार शस्त्राने खून झाला. तरबेज हा फतिमा वाचत असताना पाठीमागून आलेल्या युवकाने धारदार शस्त्राने वार करून पळ काढल्याने एकच खळबळ उडाली.

तरबेज यास चाळीसगाव येथे रुग्णालयात आणत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांची भेट घेतली असता घटनेबाबत दुजोरा देत दाखल होत असल्याचे सांगितले. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT