esakal
जळगाव

Crime News : तरूणावर गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद; तिसरी गोळी अडकल्याने आकाश बचावला

सकाळ वृत्तसेवा

Crime News : एमआयडीसीच्या व्ही-सेक्टर येथील प्रभा पॉलिमर कपंनीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच एका तरुणावर अवघ्या वीस फुटावरुन एका मागून एक दोन राऊंड फायर करण्यात आले.

तीसऱ्या वेळेस मात्र पिस्तुलीत गोळी अडकल्याने आकाश तंवर हा तरूण थोडक्यात बचावला. दरम्यान, गोळीबाराचा हा संपुर्ण घटनाक्रम सिसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ( 2 rounds were fired at young man from 20 feet one behind other jalgaon crime news )

संशयीत स्वप्नील ऊर्फ सोपान चांदुसिंग मोरे- राजपुत (वय २५, रा. कुसूंबा, ता. जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. कुसूंबा(ता. जळगाव) येथील आकाश प्रेम तंवर (वय २४) याचा मित्र संतोष बब्या कोळी (रा. कूसंबा) याचा आणि सोपान ऊर्फ स्वप्नील चंदुसिंग मोरे- राजपुत यांचे भांडण झाले होते.

बब्या कोळीने सोपान राजपुतच्या डोक्यात दगड टाकून त्याचे डोके फोडले होते. या मारहाणीच्या रागातून सोपान हा बब्या व आकाश तंवर या दोघांना शोधत होता. गुरूवारी (ता. १०) सकाळी अकराच्या सुमारास आकाश नेहमीप्रमाणे खासगी कंपनीत कामावर गेला होता.

या कंपनीच्या बाहेर आकाश हा रोहित पवार, अनील गोरख सैंदाणे, समाधान संभाजी पाटील, भरत कारभारी चांदवडे, धिरज पवार या मित्रांसह गप्पा मारत उभा होता.

त्यावेळी दुचाकीवरुन अजय पाटील व विपुल पाटील (दोघे रा. कुसूंबा) घटनास्थळी आले. तर, सोपान हा पायी चालतच तेथे पोहचला. आकाशला पाहताच, शिवीगाळ करत तुझा मित्र बब्या कुठे आहे. आज तुझा आणि त्याचाही गेम करतो. असे म्हणत थेट कंबरेतून पिस्तूल काढून आकाशवर रोखली. काही कळण्याच्या आतच गोळीबार केल्याचे आकाशने फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुख्य संशयितास अटक

अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावीत, निरीक्षक जयपाल हिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पर अधीक्षकांनी घटनास्थळावरुनच तपासचक्रे गतीमान केली.

प्रमुख संशयीत सोपान ऊर्फ स्वप्नील मोरे हा मन्यारखेडा येथे असल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर सावळे, इमरान सैय्यद, सचीन मुंढे, योगेश बारी, किशोर पाटील, सचीन पाटील, मुद्दस्सर काझी, मुकेश पाटील, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंढे, निलोफर सैय्यद यांच्या पथकाने मन्यारखेडा शिवारातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयितास झडप मारुन ताब्यात घेतले.

पिस्तुलीसह काडतूस ताब्यात

संशयित सोपानला ताब्यात घेऊन पोलिस प्रसाद देताच त्याने गुन्हा कबुल केला. गोळीबार केलेली गावठी पिस्तुल पोलिसांना काढून दिली असून, त्यात एक जिवंत काडतूस आणि घटनास्थळावरुन दोन पितळी पुंगळ्या पंचनामा करुन पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

३ दिवसांपुर्वीच खरेदी केला गावठी कट्टा

आठ दिवसांपुर्वी त्याचे डोके फोडल्याच्या रागातून सोपान हा बदला घेण्याची तयारी करत होता. त्यातच त्याला पिस्तुलची माहिती मिळाली. त्याने तीन दिवसांपुर्वीच १६ हजार रूपयांत गावठी कट्टा आणि तीन काडतूस खरेदी केले होते, अशी माहिती प्राथमीक चौकशीत मिळाली आहे. त्याला न्यायालयातून पोलिस कोठडीत घतल्यावर अधीक चौकशी केली जाणार असल्याचे निरीक्षक जयपाल हिरे म्हणाले.

गोळीबाराची प्रथासुरु

किरकोळ-किरकोळ वादात आता गावठी पिस्तुलीचा वापर होऊ लागला आहे. त्यात जळगाव शहरात प्रत्येक गुन्हेगाराकडेच पिस्तुल असल्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

* २१ एप्रिल : आसोदा येथील हॉटेलबाहेर चिंग्या गँगकडून गोळीबार

* १७ जुलै : शिवाजीनगर हुडकोत गुटख्याच्या पुडीवरुन गोळीबार

* २७ जुलै : कानळदा रोड केसी पार्कमध्ये शुभम माने-चिंग्या टोळीत क्रॉस फायरींगचा थरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT