Jalgaon Accident News : शहराजवळ एका विचित्र अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. पूर्णाड येथील एकाने आत्महत्या केल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.
त्यांना पाहून पूर्णाड गावी दोन तरुण दुचाकीवरून परतत असताना समोरून येणाऱ्या वाहनाची समोरासमोर धडक झाली.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
या गंभीर अपघातानंतर पाठोपाठ येणाऱ्या दोन दुचाकीही या गाड्यांवर आदळल्यामुळे विचित्र अपघातात दुचाकीस्वार रोहित गाढे व प्रदीप वाघ यांचा मृत्यू झाला; तर इतर चार जण जखमी आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १९) सकाळी अकरा ते दुपारी बाराच्या दरम्यान घडली.
तालुक्यातील पूर्णाड येथील दीपक अशोक इंगळे यांनी आत्महत्या केल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांना पाहून पूर्णाड गावी परतत असताना रोहित मुकेश गाढे आणि प्रदीप छगन वाघ यांचा समोरून येणाऱ्या गाडीशी समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.
या गाडीत कमलेश सुभाष पाटोळे, लीलाबाई सुभाष पाटोळे, मनीषा सुभाष पाटोळे होते. त्या पाठोपाठ येणाऱ्या दोन दुचाकीही या गाड्यांवर आदळल्याने विचित्र अपघात होऊन त्यात अशोक गंगाराम सावळे हेही जखमी झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अपघातात रोहित गाढे (वय १९) तसेच प्रदीप वाघ (२८, दोघे रा. पूर्णाड) हे दोघे ठार झाले. कमलेश पाटोळे, मनीषा पाटोळे, लीलाबाई पाटोळे (रा. चांगदेव) तसेच अशोक सावळे (रा. पातोंडी, ता. रावेर) हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठत जखमींना प्रथमोपचार करून तत्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी रवाना केले.
तसेच ‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनीही उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर गाठून जखमींची भेट घेतली. त्यावेळी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक तसेच नागरिकांनी गर्दी केल्याने मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते आणि पोलिस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनीही उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. एकाच गावातील आधी एकाने आत्महत्या केल्याने आणि अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने पूर्णाड गावावर शोककळा पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.