go green scheme esakal
जळगाव

Msedcl Go Green : ‘गो-ग्रीन’मधून 20 लाखांची वार्षिक बचत; वीज ग्राहकांना सवलत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ (Go Green) योजनेंतर्गत वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडणाऱ्या जळगाव परिमंडलातील पर्यावरणस्नेही १६ हजारांवर २० लाखांची वार्षिक बचत होतेय. (20 lakh annual savings from Go Green scheme of msedcl jalgaon news)

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’, ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.

वीजबिलाचा ‘ई-मेल’

वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’ द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना ‘प्रॉम्प्‍ट पेमेंट’चा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे.

‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता ‍कैलास हुमणे यांनी केले आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

१६ हजारांवर ग्राहक

जळगाव परिमंडलांतर्गत जळगाव मंडलात १० हजार ६७७ ग्राहक ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाले आहेत. धुळे मंडलात ‘गो-ग्रीन’ मध्ये तीन हजार ८५३ ग्राहक सहभागी आहेत. तसेच नंदुरबार मंडलातील दोन हजार १३० ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ मध्ये सहभाग घेतला आहे.

अशी आहे पद्धत

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी.

याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल.

सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT