punished by POCSO Court esakal
जळगाव

Jalgaon : बालिका अत्याचारात 20 वर्षांचा कारावास; पोक्सो न्यायालयाचा निकाल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : अल्पवयीन पिडितेस फुस लावून पळवून नेत तिच्यावर सलग तीन महिने अत्याचार करणाऱ्याला जिल्‍हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि ४३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अतुल ऊर्फ योगश राजू गायकवाड असे त्याचे नाव आहे. भडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात २५ मे २०१८ ला लखन ऊर्फ विजय रमेश गायकवाड (२४, रा. गिरड) याने अल्पवयीन शाळकरी मुलीला फुस लावून पळवून नेले.

त्यास अतुल ऊर्फ राजू गायकवाड याने सहकार्य केल्याप्रकरणी भडगाव पोलिसांत पीडिताच्या आईने तक्रार दाखल केली होती. दाखल गुन्ह्यातील आरोपी त्याचा मित्र अपह्रत बालिकेसह तीन महिने बेपत्ता होते. उपनिरीक्षक आनंद पटारे यांनी तपास करून संशयितांना अटक करीत दोषारोप पत्र जिल्हा न्यायालयात सादर केले. (20 years imprisonment for child abuse 43 thousand fine Second landmark verdict of POCSO court in a row Jalgaon Crime News)

खटल्याचे कामकाज अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात सुरू होते. सरकार पक्षातर्फे ॲड. चारुलता बोरसे यांनी एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. अपहरण करून नेण्यात आलेली पिडिता व तिच्या आईने दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयाने सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे, प्रत्यक्ष साक्षीदारांच्या साक्ष आणि देान्ही पक्षाचा प्रदीर्घ युक्तिवाद झाल्यानंतर आरोपी अतुल गायकवाड यास पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी लखन ऊर्फ विजय रमेश गायकवाड याच्या विरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने त्यास २० वर्षे शिक्षा आणि ४३ हजारांचा दंड ठोठावला आहे.

असे कलम अशी शिक्षा

- बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम-२०१२ च्या कलम-६ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास, २० हजारांचा दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कैद

-पोक्सो कलम-४ अन्वये १० वर्षे स्‍श्रम कारावास १० हजार दंड, दंड न भरल्यास ४ महिने सश्रम कैद

-पोक्सो कलम-८ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास, १ हजार दंड, दंड न भरल्यास २ आठवडे सश्रम कैद

-पोक्सो कलम-१२ अन्वये १ वर्षे सश्रम कारावास १ हजार द्रदंड, दंड न भरल्यास २ आठवडे सश्रम कैद

-भादवि कलम-३६३ अन्वये ४ वर्षे सश्रम कारावास ४ हजार द्रव्यदंड, दंड न भरल्यास १ महिला सश्रम कैद

-भादवि कलम-३६६(अ) अन्वये-५वर्षे सश्रम कारावास ५ हजार द्रव्यदंड, दंड न भरल्यास२ महिने सश्रम कैद

सलग दुसऱ्या दिवशी मोठा निकाल

जळगाव जिल्‍हा व सत्र न्यायालयात बालकांवरील अत्याचाराच्या खटल्यांचे कामकाज विशेष पोक्सो न्यायालयात जलद गतीने चालवले जात आहे. अतिरिक्त सत्र न्या. बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात आदल्याच दिवशी धरणगावातील बालिका अत्याचार प्रकरणात शिक्षा झाली. आज, पुनश्च भडगावच्या गुन्ह्यातील आरेापीला सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. दोन्ही निकाल बालकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचणारे असेच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT