21percent increase in RTO revenue collection 132 crore recovery jalgaon sakal
जळगाव

‘आरटीओ’च्या महसूल वसुलीमध्ये २१ टक्के वाढ; १३२ कोटींची वसुली

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाने लक्षांकाच्या ८१ टक्के महसूल वसुलीचा लक्षांक पूर्ण केलेला आहे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आरटीओ अर्थात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षात नवीन वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, कच्ची व पक्की अनुज्ञप्ती, जुनी वाहन कर वसुली, अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलाव, पर्यावरण कर वसुली, दोषी वाहन चालकांकडून दंड वसुली यांच्या माध्यमातून एकूण १३२.६५ कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे.

२०२१-२२ या कालावधीकरिता शासनाने या कार्यालयास १६३ कोटी ८९ लाखाचे लक्षांक दिलेले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाने लक्षांकाच्या ८१ टक्के महसूल वसुलीचा लक्षांक पूर्ण केलेला आहे. २०२०-२१ मध्ये या कार्यालयाकडून १०९ कोटी ३८ लाख महसूल वसुली केली होती. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत २१ टक्क्यांनी महसूल वसुलीत वाढ झालेली आहे.

वायुवेग पथकाकडून ९० टक्के अधिक वसुली

२०२१-२२ या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या काळात कोरोना महामारीची पार्श्वभूमी असताना तसेच वाहनाची नोंदणी व रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण कमी असताना या कार्यालयाने रस्त्यावरील अंमलबजावणीच्या माध्यमातून दोषी वाहनधारकांविरुद्ध वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करून एकूण ५ कोटी ११ लाखांची दंड वसुली केली. २.३४ कोटी थकीत वाहन कर वसुलीचे उद्ष्टि पूर्ण केलेले आहे. २०२०-२१ या दरम्यान, या कार्यालयातील वायुवेग पथकाव्दारे २ कोटी ६८ लाख तडजोड शुल्क वसुली व २ कोटी १३ लाखांची थकीत कराची वसुली केलेली होती. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी वायुवेग पथकामार्फत ९० टक्के जास्त दंड वसुली करण्यात आलेली आहे.

दोषी वाहनचालकाविरुध्द कारवाई करताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक आर. डी. निमसे, श्रीकांत महाजन, सुनिल गुरव, धीरज पवार, दीपक ठाकूर, संदीप पाटील, हेमंत सोनवणे, चंद्रविलास जमदाडे, नितीन सूर्यवंशी, नितीन सावंत, सौरभ पाटील, प्रशांत कंकरेज, अविनाश दुसाने, गणेश पिंगळे, जगदीश गुंगे, विनोद चौधरी, सुनील ठाकूर यांनी कामकाज केले.

आकडे बोलतात...

वायूवेग पथकाची वर्षभरातील कारवाई

कारवाइचे प्रकार वाहनांची संख्या

  • अवैध मालवाहतूक ७९९

  • अवैध प्रवास वाहतूक १४६१

  • दोषी वाहनधारक १३९

  • योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेले १६९५

  • हेल्मेट परिधान न करणारे १७७८

  • मोबाईलवर बोलणारे ३०७

  • सीट बेल्ट न परिधान करणारे २४३

  • ऑटोरिक्षाधारक ७०८,

  • प्रवाशांची वाहतूक मालवाहतूक करणे ४०१

  • वाहनांना मागील बाजूस रिप्लेक्टर नसणारे १२१७

  • अतिजलद वेगाने वाहन चालविणारे ५२२

  • एकूण वसुली ३ कोटी ६१ लाख

अपघातात मृताची यंदा संख्या वाढली

गंभीर बाब म्हणजे रस्त्यावरील होणाऱ्या अपघातात जखमी होणाऱ्या वाहनचालकांमध्ये जरी घट झालेली असल्याचे दिसून येत असले तरी वाहन अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत लक्षणीय वाढ (११%) झाल्याचे दिसू येते. २०२१ या दरम्यान एकूण ७५२ रस्ता अपघातामध्ये ४७१ व्यक्ती मृत तर ५१४ व्यक्ती जखमी झाल्या होत्या. २०२२ या दरम्यान एकूण ७८५ रस्ता अपघातामध्ये एकूण ५२५ व्यक्ती मृत तर ३९१ व्यक्ती जखमी झालेले आहेत.

५६ कोटींचा कर वसूल

२०२१-२२ या कालावधीत एकूण ३६ हजार ९३३ दुचाकी वाहनांची तर एकूण ५ हजार १६ मोटार कार या नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या नवीन वाहनांच्या नोंदणीतून ५६ कोटी ९० लाख एकरकमी वाहन कर प्राप्त झालेला आहे. मालवाहू व इतर नवीन वाहनाच्या नोंदणीतून ४७ कोटी ९१ लाखांचा वाहन कर वसूल करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT