Jalgaon News : ‘जिल्हा कुस्ती निवड चाचणीत जिल्ह्यातील २० पहिलवानांची पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या निवड चाचणी स्पर्धांचे उदघाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते झाले.(29 wrestlers selected for Maharashtra kesari jalgaon news)
जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष राजीव देशमुख व अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळू पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. गादी आखाड्याचे पूजन बाजार समिती सभापती अशोक पाटील व माती आखाड्याचे पूजन मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटनेचे अक्षय अग्रवाल, तालुका क्रीडा अधिकारी, संचालक समाधान धनगर, विजय पाटील, तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ हजर होते. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या हस्ते विजेत्या पहिलवानांचा पदक देऊन सत्कार करण्यात आला.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे- माती गट - मोहसीन मुल्ला (चाळीसगाव, ६१ किलो गट), संदीप कंखरे (धरणगाव ५७ कि.) , राज वाकोडे (भडगाव ६५ कि.), अनिल पवार (चाळीसगाव, ७० कि.), समाधान पाटील (पारोळा, ७४ कि.), धनंजय सरोदे (चाळीसगाव, ७९ कि.), समाधान पाटील ( एरंडोल, ८६ कि.), अजिंक्य माळी (चाळीसगाव, ९२ कि.), प्रवीण बच्छाव (चाळीसगाव, ९७ कि.), गोपाल जानी (चाळीसगाव, १२५ कि.)
गादी गट- यशवंत बोरसे (जळगाव, ५७ कि.), यश अरुण मराठे (जळगाव, ६१ कि.), सुमित पाटील (एरंडोल, ६५ कि.), कल्पेश पाटील (भडगाव, ७० कि.), वैभव सोनवणे (जामनेर, ७४ कि.), शेख नासिर याकूब (सायगाव, ७९ कि.), योगेश बैरागी (चाळीसगाव, ८६ कि.), हितेश पाटील (पाचोरा, ९२ कि.), राजेंद्र भोई (पाचोरा, ९७ कि.), भावेश पाटील (चाळीसगाव, १२५ कि.)
स्पर्धेत २०० खेळाडू सहभागी झाले होते. पंच म्हणून विलास भोसले, विजय मराठे, पी. पी. पाटील, दिलीप संघेले, गुलाब चव्हाण, मंगलसिंग पवार, एस. के. पाटील, प्रशांत पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तांत्रिक समिती सुनील देशमुख संजय महाजन, संजय पाटील, अजय देशमुख, भानुदास आरके, तसेच बाळू पाटील, संजय पाटील, शब्बीर पहिलवान, संजय भिला पाटील, प्रताप शिंपी, मुख्तार खाटीक, रावसाहेब पाटील, भरत पवार, प्रवीण पाटील, हरीश शेळके, प्रशांत पाटील, विशाल महाजन, आप्पा पाटील, हसन पैलवान यांनी सहकार्य केले. एस. पी. वाघ यांनी सूत्रसंचालन केले. सुनील देशमुख यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.