Jalgaon News : आदिवासी-बिगर आदिवासींमध्ये झालेल्या संघर्षात मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार उफाळून आला आहे. मणिपूरमध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी अडकले होते. मुक्ताईनगरच्या आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून बोदवडच्या विद्यार्थांना मणिपूरमधून बाहेर काढण्यात यश मिळविले आहे.
तिघे विद्यार्थी सुखरूप असून, ते सोमवारी (ता. ८) सायंकाळी मुंबईला पोचतील. नंतर जळगावकडे येतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. (3 Jalgaon students stuck in Manipur safe All three children will come today Jalgaon News)
मणिपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व अन्य ठिकाणी मोहीत राजाराम खडपे (बोदवड), फाल्गून किरण महाजन (रा. गंगाराम प्लाट, भुसावळ), आयुष धनंजय कुमार (रा. रेल्वे क्वाटर, भुसावळ) हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील एकूण २५ विद्यार्थी असून, शासनाच्या मदतीने ते मणिपूरमधून सुखरूप बाहेर पडले असून, मंगळवारी सायंकाळी सर्व विद्यार्थी मुंबईला पोहोचणार आहेत. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे सर्वच विद्यार्थी हवालदिल झाले होते.
मोहितशी संपर्क साधला असता, त्याने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये ज्या ठिकाणी हिंसाचार सुरू आहे, तो त्या ठिकाणाहून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर राहतो. ३ मेस आरक्षणावरून दोन गटांत हिंसाचार सुरू झाला.
मोहित राहत असलेल्या ठिकाणाहून वाहने जळत असल्याचे, तसेच फायरिंगचे आवाज येत असल्याचे त्याने सांगितले.
सुरवातीला ही घटना नियंत्रणात येईल, म्हणून कुणीच मदत मागितली नाही. मात्र, हिंसाचार वाढत असून, मोहितप्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनी याठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारची मदत घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या विद्यार्थ्यांशी बोलले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल २५ विद्यार्थी याठिकाणी शिक्षणासाठी राहत होते.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
महाराष्ट्र सरकारच्या मदतीमुळे मणिपूरमध्ये अडकलेले सर्व विद्यार्थी मणिपूरमधून सुखरुप बाहेर पडले आहेत. आता सध्या विद्यार्थी शासनाच्या मदतीने विमानाने गुवाहाटी याठिकाणी पोहचले आहेत.
याठिकाणाहून विद्यार्थी सायंकाळी साडेसातपर्यंत मुंबई याठिकाणी पोहोचणार आहेत. त्यानंतर तेथून हे विद्यार्थी आपआपल्या गावाकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती मोहित खडपे याने दिली.
मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर बोदवडच्या मोहितला महाराष्ट्रात परत आणावे, यासंदर्भात त्याच्या नातेवाइकांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्याजवळ मदत मागितली.
आमदार पाटील यांनी तात्काळ राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तात्काळ यंत्रणा फिरवत त्यामुळे मणिपूरमध्ये देखील यंत्रणा कामाला लागली आणि विद्यार्थ्यांच्या परतीसाठी प्रयत्न सुरू झाले.
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले, की किरण महाजन यांनी त्यांचा मुलगा मणिपूरला अडकल्याचे सांगीतले. मी जिल्हा प्रशासनाशी बोललो. त्यांनी मंत्रालयात संपर्क साधून माहिती दिली. सायंकाळी श्री. महाजन यांचा मुलगा फाल्गून महाजन मुंबईत येत आहे. उद्यापर्यंत भुसावळला येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.