6 lakh 29 thousand brass sands will be excavated in Ratnagiri 
जळगाव

Sakal Exclusive : अबब.. तब्बल 3 हजार ब्रास वाळूसाठ्याचे गौडबंगाल! महसूलची पाटबंधारेला नोटीस

सकाळ वृत्तसेवा

Sakal Exclusive : हतनूर धरणाच्या अतिरिक्त दरवाजांच्या कामासह अन्य कामांसाठी पाटबंधारे विभागाला आवश्‍यक असलेल्या वाळूसाठी उपशाचा गट नेमून दिल्यानंतर तेथून उपसा न करता तो ठेका ‘सरेंडर’ करण्याबाबत विभागाने महसूल विभागाला कळविले खरे.

मात्र, असे असताना हतनूर धरणाच्या संबंधित कामाच्या ठिकाणी तीन हजार ब्रास वाळूसाठा आढळून आला असून, ही वाळू नेमकी कोठून आणली? याबाबतचे उत्तर भुसावळ तहसीलदारांनी पाटबंधारे विभागाला नोटीस पाठवून मागविले आहे.

वाळू माफियांची मुजोरी, महसूल पथकांवरील हल्ले, अगदी प्रांताधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना धमकावण्याचे प्रकार सुरु आहेत. (3 thousand brass deposits of sand were found at related work site of Hatnur Dam jalgaon news)

एकीकडे भर पावसाळ्यात नदीपात्रांतून अवैध वाळू उपसा सुरु असताना व त्यावरील नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात असताना दुसरीकडे शासकीय विभागाच्या माध्यमातून साठा करण्यात आलेल्या वाळूबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याने एकूणच महसूल व वाळू व्यावसायिकांच्या वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाचा विषय अनेक वर्षांपासून राज्यात चर्चेचा ठरला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची वाळू व्यवसायासंबंधी तक्रारींमुळेच कार्यकाळ पूर्ण होण्याआधी बदली झाल्याचीही चर्चा अद्याप कायम आहे.

त्यांच्या जागी बदलून आलेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हा मुद्दा अजेंड्यावर घेत कठोर कारवाईची पावले उचलण्यासंबंधी महसूल, पोलिस व परिवहन विभागाला सूचना दिल्या आहेत. तरीही, ही प्रकरणं कमी होण्याचे नाव नाही. अशातच पाटबंधारे विभागाने साठा केलेल्या वाळूबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय आहे प्रकरण

हतनूर धरणाचे अतिरिक्त आठ दरवाजे, तसेच अन्य प्रस्तावित कामांसाठी पाटबंधारे विभागाला वाळूची आवश्‍यकता होती. त्यासाठी महसूल विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर या कामासाठी लागणारी वाळू उचलण्यासाठी पाटबंधारे विभागाला भोकर गटातील साठा आरक्षित करुन देण्यात आला. त्यासंबंधीचा पत्रव्यवहार व करारही पूर्ण झाला.

भोकर गटातून वाळू उपसा व वाहतुकीसाठी पाटबंधारे विभागाने निविदा काढली. या निविदेद्वारे मक्तेदार एजन्सी नियुक्त करण्यात आली. उपसा करणाऱ्या एजन्सीने वाहतुकीसाठी दुसऱ्या मक्तेदारास काम दिले.

मात्र, ठरवून दिलेल्या गटातून दरम्यानच्या काळात वाळू उपसा झालाच नाही. उलटपक्षी वाळू उपशाचा हा ठेका ‘सरेंडर’ करत असल्याचे पत्र पाटबंधारे विभागाने महसूल प्रशासनाला दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

..तरीही तीन हजार ब्रास वाळूसाठा

पाटबंधारे विभागाने भोकर गटातून वाळू उपसा केलेला नसताना व त्याबाबत महसूल प्रशासनाला कळविले नसतानाही हतनूरच्या संबंधित कामाच्या ठिकाणी तीन हजार ब्रास वाळूसाठा आढळून आला आहे. त्यामुळे हा साठा नेमका कोठून आला? ही वाळू कुणी व कशी आणली? याबाबत प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

पाटबंधारे विभागास नोटीस

भुसावळ तहसीलदार नीता लबडे यांच्या पथकाला हा साठा आढळून आल्यानंतर श्रीमती लबडे यांनी याबाबत पाटबंधारे विभागाला नोटीस बजावली आहे. भोकर गटातून वाळू उपसा केलेला नाही, तर मग ही वाळू आणली कोठून? या प्रश्‍नावर महसूल प्रशासनाने खुलासा मागविला आहे.

पाटबंधारेला दावा अमान्य

पाटबंधारे विभागाने मात्र भुसावळ तहसीदारांनी नोटिसीत उल्लेख केलेल्या तीन हजार ब्रास वाळू साठ्याचा दावा अमान्य केल्याचे समजते. मुळात हा साठा तीन हजार ब्रासचा नाही, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. साठा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेकडून मोजल्यानंतर महसूल प्रशासनाला उत्तर देण्याची भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे.

"हा दोन विभागांमधील अंतर्गत मुद्दा असून, या वाळूसाठ्याबाबत पाटबंधारे विभागाला पत्र दिले आहे. त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल." -नीता लबडे, तहसीलदार, भुसावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT