Superintendent of Police along with the two-wheeler thief. Inspector Kishan Najanpatil and team esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मालकाचा विश्वासघात करून 30 दुचाकी लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : मालकाचा विश्वास घात करून दुचाकी शोरूमच्या नोकराने चक्क तीस दुचाकी चोरून विकल्याची घटना गुन्हे शाखेने उघडकीस आणली असून, संशयिताला अटक केली आहे. (30 bike stolen by workers in company jalgaon crime news)

भडगाव येथील साई ऑटो बजाज शोरूममधील तब्बल ३० दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी संबंधित शोरूमच्या मालकाची स्टॉकबाबत विचारपूस केली असता, त्यांनी त्यांच्या स्टॉकमधून १४ पल्सर व १६ प्लॅटिना, अशा ३० दुचाकी कमी असल्याचे सांगितले. त्यांची किंमत २२ लाख, ७७ हजार ९८० रुपये असल्याचेही सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नंतर गुन्हे शाखेच्या पथकाने शोरूममधील कर्मचारी शोएब खान रऊफ खान (रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) याची विचारपूस केली असता, त्याने शोरूममधून साधारण तीन महिन्यांपासून वेळोवेळी एक-एक दुचाकी बाहेर काढून इतरांना कमी पैशांत विकल्याची कबुली दिली.

गुन्हे शाखेच्या पथकाने संशयिताच्या माहितीवरून ११ पल्सर व १५ प्लॅटिना दुचाकी ताब्यात घेतल्या. त्यांची किंम १९ लाख ५८ हजार १३९ रुपये आहे. संशयिताला भडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Sawant: शायना एनसींवर खरंच आक्षेपार्ह टीका केली का?; अरविंद सावंत म्हणतात, हिंदीत...

IND vs NZ, 3rd Test: जडेजाच्या ५ अन् वॉशिंग्टनच्या ४ विकेट्स; पहिल्याच दिवशी किवींचा डाव गडगडला, आता भारताच्या फलंदाजांची कसोटी

मुलगा होणार की मुलगी? जन्माआधीच मराठी अभिनेत्रीने सांगितलं बाळाचं जेंडर; शेअर केला व्हिडिओ

Bhau Beej 2024 Gift Idea: भाऊबीजच्या दिवशी बहिणीला द्या 'ही' खास भेटवस्तू, नातं होईल अधिक मजबुत

Latest Marathi News Updates: विरोधकांना महिलांचे सक्षमीकरण नको आहे - श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT