Jalgaon News : मध्य रेल्वेत आठ महिन्यांत तीन हजार २०० चेन पुलिंगच्या घटना घडल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी ७३९ रेल्वे प्रवाशांवर कारवाई करून अडीच लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे एक हजार ७५ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला होता. (3200 incidents of railway chain pulling in 8 months jalgaon news)
आपत्कालीन परिस्थितीत गाडी थांबवण्यासाठी प्रत्येक रेल्वे डब्यात ‘अलार्म चेन’ दिलेली असते. मात्र, अनेकदा किरकोळ कारणांसाठी ‘चेन पुलिंग’चे प्रकार घडत असल्यामुळे रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळी सुट्या, गणेशोत्सव, दिवाळी सुट्यांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सुरू असतात.
मात्र, या काळात ‘चेन पुलिंग’च्या घटना वाढत असल्याचे दिसते. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आपत्कालीन चेन खेचल्याच्या सुमारे तीन हजार २०० घटना घडल्या. त्यात मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये एकूण ७९३ प्रवाशांवर कारवाई केली. या कारवाईत त्यांच्याकडून दोन लाख ७२ हजारांचा दंड वसूल केला आहे.
या ‘चेन पुलिंग’च्या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील एक हजार ७५ लोकल आणि मेल-एक्स्प्रेसला फटका बसला. यात मुंबई विभागातील ३४४ लोकल, मेल-एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले. नोव्हेंबरमध्ये ४३५ घटनांत १९७ मेल-एक्स्प्रेसचे वेळापत्रक विस्कळित झाले होते.
कोणत्या स्थानकात सर्वाधिक घटना
कल्याण, दादर, ठाणे, सीएसएमटी, कसारा, पनवेल, एलटीटी आणि आंबिवली, टिटवाळा स्थानकांदरम्यान सर्वाधिक ‘चेन पुलिंग’चे प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. १५०६६ पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेस, १५०१७ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, १२३२२ सीएसएमटी-हावडा मेल (अलाहाबादमार्गे), १२८०९ सीएसएमटी-हावडा मेल (नागपूरमार्गे), १२५३४ सीएसएमटी-लखनौ पुष्पक एक्स्प्रेस, २२५३८ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस या गाड्यांत ‘चेन पुलिंग’च्या घटनांची संख्या अधिक आहे.
मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन
अनावश्यक कारणांसाठी ‘अलार्म चेन पुलिंग’ करू नका. त्यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होते. अनावश्यक परिस्थितीत ‘अलार्म चेन’ ओढणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आपली ट्रेन सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस/स्थानकावर पोचण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.