Jalgaon News : भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांच्या सततच्या पाठपुराव्याने राज्याचे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यावलचे प्रसिद्ध श्री महर्षी व्यास मंदिरासाठी व विविध विकास कामांसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.
शहरवासीयांसह भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.(4 Crore Fund for Maharshi Vyas Mandir Amol Javale efforts succeeded jalgaon news)
येथील प्रसिद्ध श्री महर्षी व्यास मंदीर तालुक्यातील महत्वाचे तिर्थस्थळांमध्ये असुन ,या ठीकाणी वर्षभर दर्शनासाठी भाविक येत असतात, गुरूपौर्णिमेस या मंदिरावर दर्शनासाठी भाविकांची लक्षवेधी गर्दी होते .
या देवस्थानातील विविध विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी सतत पर्यटन मंत्रायलयाच्या माध्यमातुन व महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या मदतीने पाठपुरावा करीत श्री व्यास मंदिर व श्रीराम मंदीर येथे ग्रंथालय , किर्तन सभागृह , संतनिवास, ऑडीटॅारीयम आणी महाप्रसादालय व इतर बांधकाम करणे आदी विकासकामांसाठी शासनाकडून चार कोटी रूपयांचा निधी मंजुर करून आणला असुन याबाबत शासकीय दरपत्रक देखील जारी करण्यात आले आहे .
या चार कोटी रुपयांच्या निधीतुन एक कोटी २०लाख रूपयांचा निधी हा जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे . दरम्यान या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी आनंद व्यक्त केला असुन या निधीमुळे श्री महर्षी व्यास महाराजांच्या मंदिराचा व श्रीराम मंदीराच्या अत्यावश्यक असलेल्या कामांना गती मिळणार असल्याचे नमुद केले असुन , या कामासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , पर्यटनमंत्री गिरीष महाजन , जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार लताताई सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे जावळे यांनी म्हटले आहे .
यावलमधील विकासासाठी साडेसहा कोटी
यावल शहरातील विविध भागातील रस्ते व विकासकामांसाठी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या प्रयत्नाने व आमदार बच्चू कडू यांच्या सततच्या पाठपुराव्याने नगरविकास मंत्रालयाकडून साडेसहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या विकास कामांसाठी निधी मंजूर झाल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील तारकेश्वर मंदिरालगतची संरक्षणभिंत बांधणे ८० लाख रुपये, बोरावल गेट ते भुसावळ नाका रस्त्याचे डांबरीकरण व कॉंक्रिट दुभाजक बांधणे यासाठी एक कोटी रुपये, व्यास नगर, पांडुरंग सराफनगर व स्वामी समर्थनगरमधील रस्ते यांचे डांबरीकरण करणे एक कोटी रुपये, आयशा नगर प्रभू लीला नगर स्वामीनारायण नगर या वस्त्यांमध्ये रस्त्याचे डांबरीकरण तथा गटारीचे कॉंक्रिटीकरण करणे यासाठी एक कोटी ७० लाख रुपये, श्री गजानन महाराज मंदिर परिसर बाबा नगर एकरानगर रजा नगर रस्त्याचे डांबरीकरण व गटारीचे काँक्रिटीकरण करणे एक कोटी रुपये नगरपालिका हद्दीतील गट क्रमांक ७०९,७१०,व ७१२ मध्ये रस्ते डांबरीकरण व साईड गटारी बांधणे ५० लाख रुपये ,डांगपुरा कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे ५० लक्ष असे सहा कोटी ५० लाख रुपयांचा निधी शहरासाठी मिळाला आहे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणे आधी विकास कामे व्हावी शहरातील विविध वस्त्यामधील विकास कामासाठी निधी मंजूर झालेला आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे.लोकसभेच्या निवडणूकआधी शहरातील विकासकामे गतीने व्हावीत अशी अपेक्षा येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.