Jalgaon Crime News : लहान मुले पकडणारी टोळी असल्याच्या संशयावरून चार तरुणांना लोणी येथील ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. त्यांच्या गाडीची तोडफोड केली.
परंतु ऐनवेळी पारोळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार घटनास्थळी पोहोचल्याने त्यांनी जमलेल्या हजारोच्या जमावास पांगविले आणि त्या चार तरुणांना वाचविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. (4 youths beaten up on suspicion of being part of gang of child abductors jalgaon news)
तालुक्यातील लोणी येथील नागरिकांनी एका कारला (एमएच ०४, इएच १७४६) गुरुवारी (ता. २८) रात्री नऊच्या सुमारास अडविले. त्या कारमध्ये चार तरुण होते. यात नरेंद्र सुनील जाधव (वय १८, धंदा वेटर, रा. गेंदालाल मिल क्वॉर्टर, जळगाव), शेख मोहम्मद अनास मोहम्मद अब्दुल्ला (वय २४, रा. फातिमा नगर, जळगाव), नसिरुद्दीन हाबुद्दीन शेख (वय ४५, रा. क्वॉर्टर गेंदालाल मिल, जळगाव), तेजज एजाज शेख (वय ३१, रा. गेंदालाल मिल, ह. मु. उमर कॉलनी, मारवाडी गल्ली, पाठीमागे जळगाव) या चार तरुणांना कारमध्ये लहान मुलांच्या चपला आढळल्याने विचारपूस केली.
परंतु नागरिकांचे समाधान न झाल्याने त्यांनी चौघांना बेदम मारहाण केली. याबाबत पारोळा पोलिसांना दूरध्वनीवरून माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुनील पवार, वाहनचालक व एक पोलिस कर्मचारी असे तीन लोक घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्या चार तरुणांना वाचविण्यात पोलिसांना यश आले. हे चार तरुण असोदा येथे दर्ग्यावर आले होते. परंतु तेथील काही लोकांना यांच्या वेशभूषेमुळे संशय आला.
त्यांनी यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते थांबले नाही म्हणून त्यांचा संशय जास्त बळावला. त्यातूनच त्यांनी कार पुढील गाव धुळे पिंपरी व लोणी येथील नागरिकांना दूरध्वनीवरून या कारविषयी माहिती दिली. त्यानुसार ही कार अडविण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच अमळनेर भागाचे विभागीय पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांनी घटनास्थळ लोणी, धुळपिंपरी, मालखेड, कासोदा येथे प्रत्यक्ष जाऊन घटनेची चौकशी केली.
संशयितांना चौदा जण अटकेत
या गुन्ह्यात परिसरातील १४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यात संशयित रामकृष्ण गंगाराम पाटील (वय ४८), रोहित संभाजी पाटील (वय १८), ईस्माईल नथ्थू शहा (वय ४८), विजय रवींद्र पाटील (वय २४), सौरव सतीश पाटील (वय २३), कौशल सुरेश पाटील (वय २१), राहुल वसंत केदार (वय ३२), जीवन दत्तू पाटील (वय २३), लहू संतोष पाटील (वय ३६) (सर्व रा. धुळपिंप्री, ता. पारोळा), शेख अदिल शेख सईद (वय १८), जहांगिर शेख मुक्तार (वय २०), कल्पेश केशव वाणी (वय ३७), (दोन्ही रा. कासोदा, ता. एरंडोल), पवन राजाराम पाटील (वय ३७, रा. मालखेडा, ता. एरंडोल), राहुल जीवराम पाटील (वय २५, रा. लोणी) यांच्याविरुद्ध नरेंद्र जाधव (रा. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व १४ संशयिताना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.