A bus fell under the road after the rod broke near the Ahilya bridge over the Bhima river in Pandharpur. esakal
जळगाव

Jalgaon News: बसचा रॉड तुटला अन्...बा विठ्ठलानेच आपल्याला सुखरूप वाचवले!

पंढरपूरजवळ गतिरोधकावर आदळून बसचा रॉड तुटला, खानदेशातील ४४ भाविक बचावले

सकाळ वृत्तसेवा

Karakamb/ Jalgaon News : आषाढी वारीसाठी भाविकांना घेऊन आलेल्या बसचा पंढरपुरातील भीमा नदीवरील अहिल्या पुलाजवळील गतिरोधकावर आदळून रॉड तुटला. परिणामी बसविरुद्ध बाजूला रस्त्याखाली जाऊन आदळली.

यातील भाविकांना किरकोळ जखमा वगळता कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, बा विठ्ठलानेच आपल्याला या संकटातून वाचविल्याची भावना बसमधील प्रवाशांनी व्यक्त केली. (44 devotees from Khandesh rescued when rod of bus broke after hitting speed breaker near Pandharpur jalgaon news)

जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगाराची एमएच १४ बीटी १८५१ ही बस तेथील हातेड या गावातील ४४ स्त्री-पुरुष भाविकांना घेऊन पंढरपूरला आली होती. ही बस पंढरपूर नजीक आली असता भीमा नदीवरील अहिल्या पुलानजीक असणाऱ्या गतिरोधकाचा चालकास अंदाज आला नाही.

परिणामी बस आहे, त्या वेगात त्यावर आदळून पुढील दोन चाकामधील तिचा रॉड तुटला. परिणामी बस रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजूस रस्त्याखाली जाऊन बंद पडली.

यावेळी बसमधील भाविकांना काही क्षण आता आपला मोठा अपघात होणार असे वाटून धक्का बसला. पण थोड्याच वेळात आपण सुखरूप आहोत, हे समजताच ‘बा विठ्ठलानेच आपल्याला वाचवल्याची त्यांची भावना झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गतिरोधकावर पांढरे पट्टे आवश्यक

पंढरपूर -टेंभुर्णी मार्गावर करकंबपर्यंत अनेक गतिरोधक आहेत. पण त्यावर पांढरे झेब्रा पट्टे नसल्याने नवीन चालकाच्या ते लक्षात येत नाहीत. परिणामी त्यावर वाहने आदळून यापूर्वीही अपघात झाले आहेत.

आजचाही भाविकांच्या बसचा अपघात पांढरे झेब्रा पट्टे नसल्यानेच झाल्याचे बसमधील प्रवासी भाविक संजीव सोनवणे यांनी ‘सकाळ’ ला सांगितले. या मार्गावर नदीच्या दोन्ही बाजूला दोन, मातोश्री सरूबाई माने विद्यालयाजवळ दोन, भोसे फाटा चौकात दोन, करकंब येथील उजनी वसाहत, नेमतवाडी चौक व जळोली चौक याठिकाणी प्रत्येकी दोन इतके गतिरोधक आहेत.

मात्र एकाही ठिकाणी पांढरे झेब्रा पट्टे नाहीत. सध्या आषाढी वारीमुळे पंढरपुरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या बस आणि खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उपरोक्त ठिकाणी त्वरित पांढरे झेब्रा पट्टे मारावेत, अशी मागणी प्रवासी भाविकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT