A field-grown dryland cotton crop.  esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात 49 टक्के पेरण्या पूर्ण; कापसाचा पेरा सर्वाधिक...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : शहरासह जिल्ह्यात गेल्या गुरुवार (ता. ६)पासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे काही ठिकाणी खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत ४९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे.

काही ठिकाणी पिके डोलू लागली आहेत. तब्बल एक महिना उशिराने पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (49 percent sowing is complete in district jalgaon news)

रोज काहीना काही प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतात पिकांबरोबर तणही वाढत आहे. तण काढणे, काडीकचरा व धस वेचणे, अशी कामे शेतात सुरू आहेत. अनेक ठिकाणी पिकांची वाढ अर्धा ते एक फुटापर्यत झाली आहे. पिकांच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी खतांच्या मात्रा देणेही सुरू केले आहे.

सूर्यफुलाकडे पाठ

नायजर सीड्स (आरोग्यदायी बिया), सूर्यफूल, इतर तेलबियांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी मात्र पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

कापूस ७२ टक्के

कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र पाच लाख एक हजार ५६८ हेक्टर आहे. आतापर्यंत तीन लाख ६१ हजार ७५९ हेक्टरवर अर्थात, ७२ टक्के कापसाचा पेरा झाला असून, हा पेरा अधिक आहे. यात बागायती कापसाचा पेरा ५० टक्के आहे. कोरडवाहू कापूस २२ टक्के असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तालुकानिहाय झालेल्या पेरण्या अशा

तालुका---पेरण्या (हेक्टरमध्ये)--टक्केवारी

जळगाव--२५ हजार २६--४४

भुसावळ--१२ हजार ५०१--४३

बोदवड--३३ हजार २९०--५८

यावल--आठ हजार ७००--२०

रावेर--१६ हजार ५७०--५६

मुक्ताईनगर--१४ हजार ५६६--४९

अमळनेर--५० हजार ०८९--७२

चोपडा--३३ हजार ९७६--५३

एरंडोल--२९ हजार ९९०--७६

धरणगाव--१९ हजार २६७--४३

पारोळा--४० हजार ६८३--७८

चाळीसगाव--३४ हजार ३७०--४०

जामनेर--६८ हजार १९--६८

पाचोरा--२८ हजार ४५०--४९

भडगाव--११ हजार १६८--३२

एकूण--चार लाख १२ हजार ५४२--५४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT