Municipal General Assembly jalgaon esakal
जळगाव

No Hawkers Zone : अतिक्रमण रोखण्यासाठी ‘नो हॉकर्स झोन’चा दणका; पाच रस्ते आता हॉकर्समुक्त

सकाळ वृत्तसेवा

No Hawkers Zone : शहरातील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘नो हॉकर्स झोन’चा दणका देण्यात आला आहे. शहरातील पाच रस्ते हॉकर्समुक्त घोषित केले आहेत.

त्या ठिकाणी फलक लावण्यात येणार असून, अतिक्रमण केल्यास जप्त केलेली गाडी कोणत्याही परिस्थितीत परत देण्यात येणार नाही, असा ठराव शुक्रवारी (ता. ७) झाालेल्या महापालिकेच्या महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला. (5 streets in city were declared free of hawkers Jalgaon news)

सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात शुक्रवारी महासभा झाली. महापौर जयश्री महाजन अध्यक्षस्थानी होत्या. उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

शहरातील रेल्वेस्थानक परिसरात रात्री हॉकर्समध्ये वाद झाला होता. पोलिसांनी तो मिटविल्याने मोठा संघर्ष टळला होता. याच पा‍र्श्वभूमीवर रेल्वेस्थानक परिसर हॉकर्स झोन करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवला होता. त्या प्रस्तावावर चर्चा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते नितीन लढ्ढा यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला.

ते म्हणाले, की रेल्वेस्थानक परिसरात रात्री हॉकर्सच्या गाड्यांवर मोठी गर्दी होते. त्यामुळे ‘हॉकर्स’मधील वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा परिसर ‘नो हॉकर्स झोन’ करण्याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहे. त्या प्रस्तावास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

इतर चार रस्त्यांचाही सामावेश

शहरातील इतर रस्त्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्‍नही या वेळी सदस्यांनी उपस्थित केला. काव्यरत्नावली चौक ते जिल्हाधिकारी निवासस्थान चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते थेट पोलिस अधीक्षक बंगल्यापर्यंचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते थेट टॉवरपर्यंत रस्ता, कोर्ट चौक ते थेट गणेश कॉलनी चौकापर्यंत रस्ता नो हॉकर्स झोन करण्याचे प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले. नितीन लढ्ढा, नगरसेवक बंटी ऊर्फ अनंत जोशी, ॲड. दिलीप पोकळे, राजेद्र घुगे-पाटील, ॲड. शुचिता हाडा आदींनी या चर्चेत भाग घेतला.

‘नो हॉकर्स’साठी पथक नियुक्त

महापालिकेच्या महासभेत ‘नो हॉकर्स’ झोन मंजूर झाला. मात्र, त्यांची अंमलबजावणी गंभीरपणे केली जाईल काय? याबाबत अनंत जोशी यांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना आयुक्त डॉ. विद्या गायकवाड म्हणाल्या, कीया रस्त्यांवर ‘नो -हॉकर्स झोन’ असे फलक लावले जातील, तसेच त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पथकेही नियुक्त केली जातील.

रेल्वेस्थानक परिसरात रात्री ‘नो हॉकर्स’ची अंमलबजावणी करण्यासाठी रात्रीचे वेगळे पथक नियुक्त करण्यात येईल, तसेच ज्या ठिकाणी रात्री अतिक्रमण होते, त्या ठिकाणीही रात्री कारवाई करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT