50 lakhs of misappropriation by clerk in Chopda jalgaon fraud crime 
जळगाव

Jalgaon Crime News: चोपड्यात लिपिकाने केला 50 लाखांचा गैरव्यवहार

चोपड्यात लिपिकाने 50 लाखांचा गैरव्यवहार करून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News: शहरातील श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील सहाय्यक लेखापाल संशयित समाधान दत्तात्रय पाटील याने २०१४ ते २०२२ या काळात तब्बल ५० लाख ६७ हजार ८९३ रुपयांचा गैरव्यवहार करून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (50 lakhs of misappropriation by clerk in Chopda jalgaon fraud crime)

विजय नारायण बोरसे (वय ५३, रा. परीस पार्क, चोपडा) यांनी या संदर्भात फिर्याद दिली असून, या फिर्यादीत नमूद केले, की श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय (चोपडा) या ठिकाणी लिपिक (असिस्टंट अकाउंटंट) म्हणून काम करणारे समाधान दत्तात्रय पाटील यांनी २०१४ ते २०२२ दरम्यान संस्थेत विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असलेला डाटा, त्यांच्याकडून घेतलेली फी, याची माहिती ठेवण्यासाठी वापरात येण्यात असलेले सॉफ्टवेअर, स्वतःच्या नावाचा यूजर आयडी, पासवर्ड तसेच सुभाष यादवराव पाटील, पी. ए. देशमुख आणि संजय नरेंद्र कुलकर्णी यांचा एसएमके यूजर आयडी पासवर्डचा दुरुपयोग करून २ हजार ९४३ विद्यार्थ्यांकडून फी म्हणून पैसे घेऊन त्यांची स्वाक्षरी करून पैसे घेतल्याची पावती दिली.

परंतु त्यांच्या कॅशबुकमध्ये नोंद न करता ५० लाख ६७ हजार ८९७ रुपयांचा गैरव्यवहार करून संस्थेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी समाधान पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष चव्हाण तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : पर्थ कसोटी जिंकताच गौतम गंभीर तातडीने मायदेशात परतला, नेमकं असं काय घडलंय?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे 11 वाजता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

Instagram New Feature : इंस्टाग्राममध्ये 3 धमाकेदार फीचर्सची एंट्री! पटकन बघून घ्या नवं अपडेट

Shashi Ruia Passes Away: एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे निधन

म्हणून अर्जुन आणि मलायकाचा झाला ब्रेकअप ; 'हे' होतं कारण

SCROLL FOR NEXT