50 percent discount for women in ST Bus ticket fare passenger increase News Updates esakal
जळगाव

ST Bus : 50 टक्के सवलतीने वाढले तिप्पट महिला प्रवासी!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महिला दिनी सादर झालेल्‍या अर्थसंकल्‍पात राज्‍य शासनाने सर्व महिलांसाठी बसमधून प्रवासात ५० टक्के सवलत जाहीर केली. त्याची अंमजलबजावणी सुरू झाल्‍यानंतर लालपरीमधून प्रवास करण्यासाठी महिला प्रवाशांची गर्दी अधिक आहे.

मागील आठवडाभरात तिप्पट महिला प्रवाशांची संख्या वाढली असून, जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीन लाख महिला प्रवाशांनी सवलतीत प्रवास केला आहे.

राज्‍य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान योजना’ घोषित करून राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या एसटीमधील प्रवासात महिला व मुलींना तिकिटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी १७ मार्चपासून सुरू झाली आहे. त्‍याच दिवसापासून महिला प्रवाशांची ‘एसटी’त गर्दी वाढली आहे. अर्थात आता बसमध्‍ये महिला व ज्‍येष्ठ नागरिकांचीच गर्दी अधिक पाहावयास मिळत आहे.

दिवसगणीक संख्‍या वाढतेय

योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर जळगाव विभागातून पहिल्या दिवशी २१ हजार ९६१ महिला प्रवाशांनी प्रवास केला. नंतर प्रत्‍येक दिवशी प्रवाशांची संख्‍या वाढत आहे. दुसऱ्या दिवशी ६७ हजार १०९, तिसऱ्या दिवशी ६३ हजार ३९४, तर २० मार्चला तब्बल ७३ हजार, २१ मार्चला ८१ हजार व २२ मार्चला ७५ हजार महिलांनी ५० टक्के सवलतीचा लाभ घेतला.

वृद्ध, महिलांनीच भरतेय बस

परिवहन महामंडळाच्‍या बसमध्‍ये महिला, ज्‍येष्ठ नागरिक व ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत आहे. यामुळे महामंडळाच्‍या बसमध्‍ये महिला व मोफत प्रवास असलेल्‍या ७५ वर्षांवरील नागरिकच नजरेस पडत आहेत. निम्‍मे बस महिला प्रवाशांनी भरलेली पाहावयास मिळत आहे.

आगार.........महिला प्रवाशांची संख्‍या.........सवलतीची रक्‍कम

जळगाव.........३२ हजार ६५१..............१० लाख ४१ हजार ५१०

यावल...........४० हजार ५३८...............८ लाख ७३ हजार ८२७

चाळीसगाव.....३० हजार ८३६...............७ लाख १७ हजार २१९

अमळनेर........३९ हजार ८८................८ लाख ३६ हजार ३४९

चोपडा..........३६ हजार ९६७..............१० लाख २९ हजार ६७८

जामनेर..........२९ हजार ३७७...............८ लाख २९ हजार ३५

रावेर............२५ हजार ५१८...............७ लाख ४२ हजार ५५५

मुक्‍ताईनगर.....२७ हजार ४५०...............६ लाख १३ हजार २३०

पाचोरा..........२८ हजार ४९८...............७ लाख २९ हजार ३९६

भुसावळ........२१ हजार ६९३...............५ लाख ६६ हजार ५०२

एरंडोल.........३२ हजार ८५३...............६ लाख ६९ हजार ४२२

एकूण......३ लाख ४५ हजार ४६९..........८६ लाख ४८ हजार ७२३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT