Current status of water storage in anjani dam  esakal
जळगाव

Jalgaon Anjani Dam : अंजनी प्रकल्पात 50 टक्के साठा; खरीप पिकांसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Anjani Dam : शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या अंजनी प्रकल्पामध्ये सुमारे ५० टक्के जलसाठा झाल्यामुळे आगामी काळातील पाण्याची समस्या दूर झाली आहे. अंजनी प्रकल्पात पन्नास टक्के साठा झाला असला तरी तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस नसल्यामुळे खरीप पिकांची वाढ खुंटली असून, शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीसह काम पूर्ण झाले आहे, मात्र प्रकल्पाच्या वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या तीन गावांचे पुनर्वसन न झाल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा होऊ शकत नाही. (50 percent reserves in Anjani project jalgaon dam news)

प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा झाल्यास एरंडोलसह धरणगाव तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना अंजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच पाण्याची समस्या निर्माण झाल्यास धरणगावसह तालुक्यातील गावांसाठी देखील अंजनी नदीच्या पात्रात प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात येते.

प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा असल्यास रब्बी पिकांसाठी देखील पाणी सोडण्यात येते. यावर्षी पावसाळा सुरू होऊन सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लोटला असून, तालुक्यात अद्यापपर्यंत समाधानकारक पाउस झालेला नाही.

पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे अंजनी प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा होतो किंवा नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंजनी प्रकल्पात अंजनी नदीच्या उगमस्थळ परिसरात जोरदार पाऊस झाल्यास पाण्याची आवक होत असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अंजनी प्रकल्पाच्या अगोदर सुमारे चौदा लहान बंधारे असून, ते पूर्ण भरल्यानंतरच प्रकल्पात पाण्याची आवक होत असते. सद्यस्थितीत प्रकल्पात सुमारे पन्नास टक्के जलसाठा झाला असला तरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. जोरदार पावसाअभावी खरीप पिकांची वाढ खुंटली असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

विहिरींच्या जलपातळीत वाढ

पावसाअभावी अंजनी नदीला अद्यापपर्यंत एकही पूर आलेला नाही. त्यामुळे नदीच्या पात्राची गटारगंगा झाली आहे. सुमारे सहा वर्षांपासून अंजनी प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा होत असल्यामुळे तालुक्यात पाण्याची समस्या निर्माण झाली नव्हती.

अंजनी प्रकल्पात पुरेशा प्रमाणात जलसाठा झाल्यानंतर प्रकल्पातून अंजनी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नदीकाठावरील विहिरींना त्याचा फायदा होऊन पाण्याच्या पातळीत वाढ होत असते. अंजनी प्रकल्पात पन्नास टक्के जलसाठा झाल्यामुळे शहराची पाण्याची समस्या दूर झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT