जळगाव : मेहरुणमधील रहिवासी प्रमोद ऊर्फ भूषण शेट्टीच्या हत्या प्रकरणात अटकेतील संशयितांना शुक्रवार (ता. १६)पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
या प्रकरणात हत्या करणाऱ्या संशयिताने पत्नीवरील कथित वशीकरण उतरविण्यासाठी एका भोंदूबाबाला ५० हजार रुपये देऊनही उपयोग झाला नाही म्हणून त्याने थेट प्रमोदचा बळी घेतल्याचा आणखी एक पैलू समोर येत आहे. (50 thousand given to Baba for black magic type Vashikaran Jalgaon News)
सुनील ऊर्फ समीर नियामतखाँ तडवी याच्या पत्नीवर वशीकरण-भानामती (जादूटोणा) करून प्रमोद शेट्टी याने अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याचा संशय त्याला होता. परिणामी, सुनील ऊर्फ समीर याने भांडण विसरून प्रमोदशी चांगली मैत्री केली. नेहमीच दोघेही सोबत पार्ट्यांचा बेत आखून दारू ढोसायला जायचे. दारूच्या नशेत प्रमोदकडून कोरून-कोरून माहिती काढण्याचे काम सुनील तडवी करीत होता.
भोंदूबाबाच्या नादाला
वशीकरण बाबाने दिलेला टोटका आपल्या बायकोला खाऊ घालून तिच्यावर वशीकरण केल्याचा संशय तडवीला होता. गेल्या सहा महिन्यांपासून सुनील व त्याच्या बायकोचे आपसांत होणारे भांडण आणि वारंवार ती माहेरी निघून जात असल्याने वशीकरणासह जादूटोण्यावर त्याचा विश्वास बसला होता.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
त्याच बाबाने दिला तोडगा
माझ्या बायकोला खाऊ घालून वशीकरण केल्याची माहिती सुनील तडवी काढत होता. अशातच त्याला एका बाबाबद्दल माहिती मिळाली. विशेष म्हणजे त्याच बाबाने मृत प्रमोदला वशीकरणासाठी उपाय दिला असल्याची माहिती मिळाल्यावर दोघे-तिघे मित्र तोडगा काढण्यासाठी त्याच बाबाच्या दारावर गेले. या बाबाने चक्क ५० हजार रुपये सुनील तडवीकडून घेऊन वशीकरणावरील तोड दिला. मात्र, त्याचा काहीच उपयोग न झाल्याने प्रमोदच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिल्याची विश्वसनीय माहिती आहे.
चार दिवसांची कोठडी
संशयित सुनील तडवी व सत्यराज नितीन गायकवाड यांना पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, वासुदेव मराठे आदींनी न्यायालयात हजर केले. संशयितांच्या अंगावरील कपडे, गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यासाठी, तसेच दोन्ही संशयितांना नेमक्या घटनास्थळावर घेऊन जात इतर पुरावे संकलित करण्यासाठी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. अब्दुल कादीर यांनी केली. त्यावरून न्यायाधीश एम. पी. जसवंत यांनी दोन्ही संशयितांना शुक्रवार (ता. १६)पर्यंत चार दिवस पोलिस कोठडी सुनावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.