Fined Collected News esakal
जळगाव

Jalgaon News : प्रांताधिकाऱ्यांना 500 रुपये दंड; जात प्रमाणपत्रावर वेळेत निर्णय न घेतल्याने दणका

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : टोकरे कोळी जात प्रमाणपत्रावर तब्बल सहा महिने निर्णय न घेणे प्रांताधिकारी महेश सुधळकर (जळगाव) यांना चांगलेच महागात पडले असून, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ चे कलम १० (१) नुसार त्यांना ५०० रुपये दंड अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी ठोठवला आहे.

कारण नसताना जातप्रमाणपत्र अर्ज प्रलंबित ठेवणे आता महागात पडणार आहे.

सौरभ संजय सपकाळे व जान्हवी संजय सपकाळे या भावडांनी टोकरे कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्रासाठी जळगावच्या प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. (500 rupees fine to provincial officials jalgaon news)

या अर्जातील त्रुटी पूर्ण केल्यावरही व वारंवार चकरा मारूनही जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे पालकांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. त्यावर खंडपीठाने गुणवत्तेवर निर्णय घेऊन १५ मार्चपर्यंत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यानच्या काळात ८ फेब्रुवारीला प्रवर्तन बहुउद्देशीय संस्थेसमवेत झालेल्या जात प्रमाणपत्र तक्रारींवर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनीही नियमानुसार व प्राथमिक कागदपत्रे पाहून त्वरित जात प्रमाणपत्र द्यावीत, असे आदेश दिले होते. त्यानुसार जात प्रमाणपत्र देणे क्रमप्राप्त होते. अर्जदाराचे वडील, आजोबा, काका यांच्याकडे जात प्रमाणपत्र होते.

महसुली पुरावे, तसेच ३६ ‘अ’च्या नोंदी असतानाही प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी जान्हवी व सौरभ यांना टोकरे कोळी जमातीचे प्रमाणपत्र नाकारले होते, म्हणून मुलांचे पालक संजय सपकाळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अनव्ये अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अपील सुनावणीत खंडपीठाने विविध निकालांमध्ये दिलेले निर्देश व मार्गदर्शन सूचना, तसेच शासन व जिल्हाधिकारी मित्तल यांच्या सूचना विचारात घेतल्याचे वा त्याचा ऊहापोह केल्याचे दिसून आले नाही

तसेच अपिलार्थी यांच्या अर्जावर निर्णय घेताना नाहक वेळेचा अपव्यय केल्याचे दिसले. जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या कायद्यातील कार्यपद्धतीचा अवलंबही केला नसल्याने लोकसेवा देण्यास कसूर केल्याचा निष्कर्ष काढत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ चे कलम १० (१) नुसार त्यांना ५०० रुपये दंड अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी ठोठावला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे आदेश न पाळल्याने प्रांताधिकारी महेश सुधळकर यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे संजय सपकाळे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT