Solar lights and Minister Gulabrao Patil esakal
जळगाव

Jalgaon: जळगाव, धरणगाव तालुक्यातील 51 गावे सौरदिव्यांनी लखलखणार! 10 कोटींचा निधी मंजूर; मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

Jalgaon News : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत यावलचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव व धरणगाव तालुक्यांतील ५१ गावांमध्ये सौर पथदीप व हायमास्ट बसविण्यासाठी १०१ कामांसाठी तब्बल १० कोटी १० लाख निधी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत मंजूर झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत यावलचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. (51 villages in Jalgaon Dharangaon taluka will lit up with solar lights)

त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनास केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन्ही तालुक्यांतील ५१ गावांमधील आदिवासी वस्त्या सौरदिव्यांनी लखलखणार आहेत.

पालकमंत्र्यांमुळे योजनेच्या व्याप्तीत वाढ

आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन दरबारी त्यांचा हक्काचा आवाज बनून अनेक प्रश्न मांडले आहेत. ज्या गावांमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी ठक्कर बाप्पा योजनेचा लाभ मिळत नव्हता. (latest marathi news)

या योजनेचा संपूर्ण आदिवासी समाजाला लाभ मिळवून देण्यासाठी मंत्री पाटील यांनी शासन दरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ठक्कर बाप्पा योजनेची व्याप्ती वाढली आहे. या योजनेची अंमलबजावणी शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे.

धरणगाव तालुक्यामधील ३८ गावांतील, तसेच जळगाव तालुक्यातील १३ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात एकूण ५१ गावांमधील आदिवासी वस्त्यांमध्ये १०१ सौर पथदीप व हायमस्ट लॅम्प बसविण्यासाठी तब्बल १० कोटी १० लाख निधी मंजूर झाला आहे.

हे आहेत निकष...

तीन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या : १ कोटी, १५०० ते ३ हजार लोकसंख्या : ७५ लाख, १ हजार ते १४९९ लोकसंख्या : ५० लाख, ५०० ते ९९९ लोकसंख्या : ४० लाख, १०१ ते ४९९ लोकसंख्या : २० लाख, १ ते १०० लोकसंख्या : ५ लाख. लोकसंख्येच्या अधीन राहून निधी मंजूर करण्यात येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

Nashik Police : मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा तैनात; सशस्त्र आयटीबीपीची करडी नजर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

SCROLL FOR NEXT